AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी फडणवीसांना एकदा फडतूस, कलंक बोललेलो अन् आता…’; उद्धव ठाकरे यांचा फडणीसांवर निशाणा!

उद्धव ठाकरे यांनी याआधी फडणवीसांवर टीका करताना फडतूस आणि कलंक असा उल्लेख केला होता. त्यानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही शब्दांचा उल्लेख करत आणखी एक शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली.

'मी फडणवीसांना एकदा फडतूस, कलंक बोललेलो अन् आता...'; उद्धव ठाकरे यांचा फडणीसांवर निशाणा!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 27, 2023 | 5:06 PM
Share

हिंगोली : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमधील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी याआधी फडणवीसांवर टीका करताना फडतूस आणि कलंक असा उल्लेख केला होता. त्यानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही शब्दांचा उल्लेख करत आणखी एक शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली.

फडणवीसांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचं सोडून दिलं आहे. कारण काही बोललो तरी त्याचा बोभाटा होता, मी एकदा फडतूस बोललो होतो पण आता नाही बोलणार, कलंक बोललो होतो पण आता नाही बोलणार, आता थापाड्या बोलायचो होतो पण आता नाही बोलणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

फडणवीस जपानला गेले आणि म्हटले उद्योग आणणार म्हटले पण जपानपेक्षा गुजरात जवळ आहे. त्यामुळे गुजरातला गेलेले उद्योग तुम्ही आणू शकता का? नेहमी आपलं सांगितलं जातं की,मोदींनी सांगितलंय याच्यापेक्षा मोठा उद्योग तुम्हाला देऊ, अरे कुठाय उद्योग सगळ्या थापा थापा आणि खापा. जेव्हा सरकार तुमच्या दारात येईल तेव्हा होऊन जाऊदे चर्चा, प्रत्येक गावामध्ये, वाडीवरती, शेताच्या बांधावरती सर्वांना विचारा सरकारच्या या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का हे विचारा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान,  इतर पक्षांचे नेते चोरणार आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद याला नामर्द म्हणतात. स्वत:कडे ना कोणता विचार ना आचार. कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...