AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Rashi Bhavishya: लक्ष्मीपूजनाचा दिवस सहा राशींसाठी ठरणार खास, देवी लक्ष्मीच्या कृपेने चमकणार नशीब!

Horoscope Today Sunday 8 November 2026 : लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिनी ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा प्रभाव सर्व १२ राशींवर पाहायला मिळणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, काही राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहण्याची शक्यता असून त्यांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात.

Today Rashi Bhavishya: लक्ष्मीपूजनाचा दिवस सहा राशींसाठी ठरणार खास, देवी लक्ष्मीच्या कृपेने चमकणार नशीब!
Astrology
| Edited By: | Updated on: Nov 08, 2026 | 10:23 AM
Share

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि सुख-समृद्धीचा उत्सव. आज, म्हणजेच ८ नोव्हेंबर २०२६, रविवार रोजी दिवाळी साजरी केली जाणार असून या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या शुभ दिनी देवी लक्ष्मी आणि सूर्य देवाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींच्या आयुष्यावर होणार आहे.

काही राशींसाठी हा दिवस आर्थिक लाभ आणि करिअरमधील प्रगतीच्या संधी घेऊन येऊ शकतो, तर काहींना नातेसंबंध आणि आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मेष ते मीन राशींपैकी कोणासाठी हा दिवस कसा असेल, जाणून घेऊया.

मेष

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण कराल. प्रेमसंबंधांमध्ये आनंद टिकवण्यासाठी जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा. आर्थिक स्थिती आणि आरोग्य चांगले राहिल.

वृषभ

कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. दिवसभरात विनाकारण जास्त खर्च करणे टाळा.

मिथुन

कामाच्या ठिकाणी आपल्या कामाचा दर्जा आणि उत्पादकता वाढवण्यावर भर द्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क

कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने समोर येऊ शकतात; मात्र योग्य प्रयत्नांनी त्यावर मात करता येईल. आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

सिंह

कामाचा व्याप वाढल्याने दिवसभर व्यस्त राहाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करा. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या

प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवण्यावर भर द्यावा. जोडीदारासोबतचे नाते अधिक चांगले करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी असलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गरजा आणि खर्च यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

तूळ

आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने दिवस चांगला राहिल. पैशांचे योग्य व्यवस्थापन केल्यास भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळतील.

वृश्चिक

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आनंदाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदारासोबत सुखद क्षण घालवता येतील. कामानिमित्त केलेला प्रवास यशस्वी ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. आरोग्याची काळजी घ्या.

धनु

प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि सकारात्मकता राहील. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने स्वीकारल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आरोग्याशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.

मकर

स्वतःच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्याने व्यस्तता राहू शकते. अनावश्यक खर्च टाळून आर्थिक नियोजनावर भर द्या.

कुंभ

आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना कराल. गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय निवडण्यावर भर द्या. करिअरमध्ये फायदेशीर ठरणारी एखादी संधी मिळेल.

मीन

करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हलका व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घ्या. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!