AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ज्या शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी थांबलेले, तिथे जेवणाला थोडा उशीर झाला, अन् मग..मंत्र्यांनी कुटुंबाची भावना जपली

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रात्रीच्या जेवणानंतर त्याच गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार होते. मुख्यमंत्र्यांचं जेवण आटोपल्यानंतर संवाद कार्यक्रमाची वेळ झाली.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ज्या शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी थांबलेले, तिथे जेवणाला थोडा उशीर झाला, अन् मग..मंत्र्यांनी कुटुंबाची भावना जपली
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Nov 08, 2026 | 10:01 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या घरात मुक्काम करुन शेतकरी कुटुंबासोबत यंदाची दिवाळी साजरी केली. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील ‘लोहारी सावंगा’ गावात रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करुन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याच घरी जेवले. मुख्यमंत्र्यांप्रमाणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ‘लोहारी सावंगा’ गावातच ‘नंदुजी लोहे’ या शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. बावनकुळे ज्या नंदुजी लोहे यांच्या घरी मुक्कामी थांबले होते, तिथे रात्रीच्या जेवणाला उशीर झाला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रात्रीच्या जेवणानंतर त्याच गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार होते. मुख्यमंत्र्यांचं जेवण आटोपल्यानंतर संवाद कार्यक्रमाची वेळ झाली. पण बावनकुळे यांचं रात्रीच जेवण झालं नव्हतं. त्यामुळे बावनकुळे यांना काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या घरात जेवण करण्याचा सल्ला दिला. मात्र, बावनकुळे म्हणाले की, ज्या शेतकऱ्याने मला घरी रहायला जागा दिली, त्याच्या घरात मी जेवणार अशी भूमिका घेतली. जेवणाला थोडा उशीर झाला म्हणून दुसऱ्या घरात जेवणं चंद्रशेखर बावनकुळे यांना पटलं नाही. ज्या शेतकऱ्याने इतक्या आत्मीयतेने सर्व केलं, त्याचं प्रेम, स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही, याची काळजी बावनकुळे यांनी घेतली.

त्या शेतकऱ्याच्या भावनेचा मान ठेवला

शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज स्वीकारले. अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश, सचूना दिल्या व परत नंदूजी लोहे यांच्या घरी पोहोचले. रात्रीचे 11.15 झालेले. चंद्रशेखर बावनकुळे लोहे कुटुंबासोबत जेवणं केलं. त्यानंतर अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली. जेवणाला थोडा उशीर झाला. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या शेतकऱ्याच्या भावनेचा मान ठेवला व इतरांसमोर आदर्श उदहारण घालून दिला.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले सुद्धा शेतकऱ्याच्या घरी गेले 

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील इटकी येथील शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी फराळ आणि आहेर देत त्यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधला.

Follow Us
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?