AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar : हिच्याशी कोण लग्न करणार? कॉलेजमध्ये क्रांती रेडकरला पाहून समीर वानखेडेंची होती अशी प्रतिक्रिया; ‘ती’ भेट ठरली खास अन् जमली जोडी, भन्नाट आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी

Kranti Redkar Love Story : क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.

Kranti Redkar : हिच्याशी कोण लग्न करणार? कॉलेजमध्ये क्रांती रेडकरला पाहून समीर वानखेडेंची होती अशी प्रतिक्रिया; 'ती' भेट ठरली खास अन् जमली जोडी, भन्नाट आहे अभिनेत्रीची लव्हस्टोरी
| Updated on: Nov 09, 2026 | 8:11 PM
Share

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी आहे. विशेष म्हणजे, दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मात्र, कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांशी फारसं पटत नव्हतं. क्रांती रेडकर कॉलेजमध्ये बिनधास्त आणि मस्तीखोर स्वभावाची होती, तर समीर वानखेडे अभ्यासात रमणारे आणि शांत स्वभावाचे होते. एकेकाळी क्रांतीला पाहून ‘हिच्याशी कोण लग्न करणार?’ असा विचार करणाऱ्या समीर यांनी अखेर तिच्याशीच लग्न केलं. नुकत्याच एका मुलाखतीत दोघांनी आपल्या प्रेमकहाणीतील अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत.

कॉलेजमध्ये क्रांती होती ‘लेडी डॉन’!

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे यांनी कॉलेजमधील दिवसांच्या आठवणी सांगितल्या. क्रांती कॉलेजमध्ये नाटकांमध्ये सक्रिय होती. मात्र, कॉलेजमध्ये तिचा स्वभाव एखाद्या ‘लेडी डॉन’सारखा होता, असं समीर यांनी गंमतीनं सांगितलं. यावर क्रांतीनंही आपली बाजू मांडली. समीर फारसे कोणाशी बोलत नसत आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम गंभीर भाव असायचे, असं ती म्हणाली. त्यावर समीर यांनी आपण अॅटिट्यूड दाखवत नव्हतो, तर आपला स्वभावच शांत होता, असं स्पष्ट केलं.

कॉलेजमधील एक मजेशीर किस्सा सांगताना क्रांती म्हणाली की, ती कॉलेजमध्ये खूप मस्ती करायची. वर्गात जवळपास ५० मुली आणि फक्त चार मुलं होती. त्यामुळे या मुलांनीही आमच्यासोबत मजा-मस्ती करावी, असं आम्हाला वाटायचं. एकदा क्रांतीने समीर यांच्याकडे पाहून स्माइल दिली. मात्र, त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिथून निघून गेले. त्यामुळे क्रांतीला त्यांचा राग आला. ‘हा मला अॅटिट्यूड दाखवतोय, आता याला बघतेच,’ असं तिनं ठरवलं. एकदा समीर कार पार्क करत असताना तिनं आणि तिच्या मैत्रिणींनी त्यांना चांगलाच त्रास दिला होता, असा किस्साही तिनं सांगितला.

आठ-दहा वर्षांनी विमानतळावर झाली पुन्हा भेट

कॉलेज संपल्यानंतर जवळपास आठ ते दहा वर्षांनी समीर आणि क्रांती यांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी समीर वानखेडे विमानतळावर अधिकारी म्हणून कार्यरत होते. एका रात्रीच्या ड्युटीदरम्यान त्यांची क्रांतीशी भेट झाली. समीर यांनी सांगितलं की, विमानांच्या तपासणीदरम्यान ते स्क्रीनवर बॅगेजची तपासणी करत होते. त्यावेळी क्रांतीच्या बॅगेमध्ये त्यांना काहीतरी संशयास्पद दिसलं. मात्र, नंतर ते बेल्टचं बक्कल असल्याचं लक्षात आलं. यामुळे क्रांतीला सुरुवातीला समीर यांनी मुद्दाम असं केल्याचा गैरसमज झाला होता.

या भेटीबद्दल क्रांतीनेही एक रंजक आठवण सांगितली. सुरुवातीला तिनं समीर यांना ओळखलंच नव्हतं. त्यांनी आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याची आठवण करून दिली. मात्र, क्रांतीला त्यांची ओळख पटत नव्हती. त्यानंतर समीर हसले आणि त्यांच्या गालावरील खळी पाहून क्रांतीला ते कॉलेजमधील मित्र असल्याचं आठवलं. समीर यांनी आपली ओळख विमानतळावरील अधिकारी म्हणून करून दिली. त्यावेळी क्रांतीला आश्चर्य वाटलं की, कॉलेजमध्ये शांत असणारा हा मुलगा आता मोठ्या पदावर पोहोचला आहे.

या भेटीनंतरचा आणखी एक मजेशीर किस्सा दोघांनी सांगितला. क्रांतीनं सुरुवातीला समीर यांचा फोन नंबर घेतला नव्हता. मात्र, बाहेर आल्यानंतर अभिनेत्री मनवा आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी तिच्याकडे समीर यांचा नंबर घेतलास का, अशी विचारणा केली. त्यावेळी क्रांतीने नकार दिला. पण तिची आणि मनवाची बॅग दुबईला राहिल्यामुळे समीर यांची मदत होऊ शकते, असा विचार तिच्या मनात आला. त्यामुळे ती पुन्हा आत गेली आणि समीर यांचा नंबर घेतला. यावर समीर यांनी मात्र क्रांतीची फिरकी घेतली. बॅगेचा बहाणा करून तिनं मुद्दाम आपला नंबर घेतला होता, असं ते हसत म्हणाले.

या विमानतळावरील भेटीनंतर दोघांमध्ये संवाद वाढला. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट झाली. एकमेकांना मदत करणं, सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करणं यातून त्यांचं नातं अधिक जवळचं झालं. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या पहिल्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. या काळातही दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा व्हायची. कॉलेजमध्ये एकमेकांना फारसं न आवडणाऱ्या या दोघांचं पुढे एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे हे जुळ्या मुलींचे आई-वडील आहेत.

Follow Us
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड