Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आली, आता 2100 रुपये…एकनाथ शिंदेंनी सगळं सांगून टाकलं!
. आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपयांच्या लाभाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Ladki Bahin Yojana 2026 : राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आहेत. दिवाळीआधीच भाऊबीज म्हणून सरकारने हे पैसे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात पाठवलेत. सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी वेळोवेळी ही योजना कधीच बंद होणार नाही, असे सांगितलेले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपयांबाबत मोठी खुशखबर मिळाली आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनची याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार?
एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन दिले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं. सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही लाडक्या बहिणींना मिळणारा 1500 रुपयांचा लाभ पुढे 2100 रुपये केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार, असे विचारले जात होते. यावरच शिंदे यांनी महत्त्वाचे भाष्य केले.
लाडक्या बहिणींना सध्या नेमके किती रुपये मिळाले?
नोव्हेंबर महिना सुरू झालेला असताना लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे यावेळी दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु लाडक्या बहिणींना 3 नोव्हेंबर रोजीपासून सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पाठवण्यात आले. लाडक्या बहिणींना अजूनही ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपयांच्या लाभाबाबत महत्त्वाची माहिती दिली. आमचे महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार आहोत, अशी घोषणा शिंदे यांनी करून टाकली. त्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
