AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE: फटाक्यांमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड

| Updated on: Nov 09, 2026 | 8:44 AM
Share

Maharashtra News LIVE: दिवाळीत विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तब्बल 50 घटना घडल्या आहेत.

Maharashtra News LIVE: फटाक्यांमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड
live blogImage Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Nov 2026 08:44 AM (IST)

    नाशिकमध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर 800 कोटींची उलाढाल; सोने, वाहने आणि घरखरेदीला मोठी पसंती

    दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेत खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, कपडे, घरे आणि पूजासाहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, यंदा लक्ष्मीपूजनाच्या एकाच मुहूर्तावर नाशिकमध्ये तब्बल 800 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी विशेष पसंती दिली. याशिवाय वाहन आणि गृहखरेदीलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मुहूर्तावर सुमारे 3 हजार 750 दुचाकींची विक्री झाली असून, 450 चारचाकी वाहनांचीही खरेदी करण्यात आली. तर 700 हून अधिक घरांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे.

  • 09 Nov 2026 08:41 AM (IST)

    नाशिकमधील त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवस्थान आणि काळाराम मंदिराला धमकीचा ई-मेल

    नाशिकमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी मंदिर आणि नाशिकमधील काळाराम मंदिराला नुकसान पोहोचवण्याची धमकी या ई-मेलद्वारे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या सणात हा धमकीचा ई-मेल आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, तिन्ही देवस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे या धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

  • 09 Nov 2026 08:40 AM (IST)

    धाराशिवच्या येडशीत घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

    धाराशिव तालुक्यातील येडशी इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास घराला भीषण आग लागली. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये करंडे यांचे आई-वडील, दोन मुली आणि पती-पत्नीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहाटे 4.20 वाजता घटनास्थळी धाव घेतली.

  • 09 Nov 2026 08:38 AM (IST)

    पुण्यात थंडीची चाहूल; सकाळी धुक्याची चादर, तापमानात घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

    पुणेकरांना आता दिवाळीनंतर हळूहळू थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. शहरात थंडीची चाहूल लागली असून, काही भागांमध्ये सकाळच्या वेळी धुकेही पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराच्या किमान तापमानात सातत्याने घट नोंदविण्यात येत असल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. विशेषतः सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. दिवाळीच्या काळातच वातावरणात झालेला हा बदल पुणेकरांसाठी सुखद ठरत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत शहराच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे विभागाने वर्तवली आहे.

  • 09 Nov 2026 08:37 AM (IST)

    पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; विरार-नालासोपारा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने

    लक्ष्मीपूजनानंतर मुंबईकरांचा कामावर जाण्याचा प्रवास आज खोळंबला आहे. विरार आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल वायरिंगला आग लागून त्या जळाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बिघाडाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून, विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुमारे 15 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. लक्ष्मीपूजनाला वाजवलेल्या फटाक्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल वायरिंग जळाल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल पंधरा ते अर्धा तास उशिराने धावत आहेत. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला असून अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीत वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. ‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (EWS) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 9 नोव्हेंबरपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत जाण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस ती याच स्थितीत राहू शकते. यासह इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Nov 09,2026 8:33 AM

Follow Us
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story