AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा पराभव पण टीम इंडियाच्या कॅप्टनला संघाचा भलतंच कौतुक, काय म्हणाला?

IND vs PAK Match Result: भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला जो पाकिस्तानने जिंकला. आता यानंतर भारतीय कर्णधाराने काय बोलून दाखवलं ते पाहा...

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा पराभव पण टीम इंडियाच्या कॅप्टनला संघाचा भलतंच कौतुक, काय म्हणाला?
| Updated on: Nov 09, 2026 | 8:31 AM
Share

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला. भारतीय फलंदाजांची कामगिरी ही अतिशय लाजिरवाणी पाहायला मिळाली. लक्ष्य रायचंदानीच्या नेतृत्वाखालील भारताच्या १९ वर्षांखालील संघाला रविवारी पाकिस्तानकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. एसीसी १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामन्यात भारतीय संघ ४६.३ षटकांत २०८ धावांवर सर्वबाद झाला. अर्जुन राजपूतने (८५ चेंडूंत १०७ धावा, ११ चौकार, पाच षटकार) शतक झळकावण्यापूर्वी भारताने ४२ धावांत चार गडी गमावले होते. काव्या पटेलच्या ४५ चेंडूंत २३ धावांनी भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. तो भारताकडून बाद होणारा शेवटचा खेळाडू होता. प्रत्युत्तरात, पाकिस्तानने ४८.१ षटकांत सात गडी गमावून २०९ धावा करत सामना जिंकला. पराभवानंतर भारतीय कर्णधाराने काय म्हटलं ते पाहा…

६१ धावांत पाच गडी गमावल्यानंतर पाकिस्तानने पुनरागमन केले. हमजा झहूरने (१०८ चेंडूंत नाबाद १०० धावा, १० चौकार, तीन षटकार) शतक झळकावले. त्याने हसनेन दार (६७ चेंडूंत ३८ धावा) सोबत सहाव्या विकेटसाठी १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ओमानमधील अल अमेरत येथे पाकिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर, भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कर्णधाराने कटू सत्य मान्य केले.

भारतीय कर्णधार काय म्हणाला?

सामन्यानंतर लक्ष्य म्हणाला, “धावसंख्या पुरेशी नव्हती. आम्ही २०-३० धावांनी कमी पडलो. काही चांगल्या खेळी झाल्या. अर्जुन राजपूतने शतक झळकावले आणि काव्य पटेलनेही चांगले योगदान दिले. ही खरोखरच एक चांगली खेळी होती. जर अर्जुनसारखा कोणी आमच्यासोबत टिकून राहिला असता, तर धावसंख्या आणखी चांगली झाली असती. आम्ही निश्चितपणे या दिशेने सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. या सामन्यात अनेक सकारात्मक गोष्टी होत्या आणि आम्ही त्यावरच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजांनी उत्तम प्रयत्न केले. पाकिस्तानने ६१ धावांत ५ विकेट गमावल्या. आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. पण एकूणच, ते चांगले होते.”

Follow Us
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story