Dharashiv Fire : धाराशिवमध्ये एका घराला लागली भीषण आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Dharashiv Fire : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Dharashiv Fire
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. गोविंद करंडे यांच्या घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये करंडे यांचे आई-वडील, दोन मुली आणि पती-पत्नीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहाटे 4.20 वाजता घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कळंब आणि तुळजापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या.
(बातमी अपडेट होत आहे)
Follow Us
