AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात दिवाळीला गालबोट! जागोजागी आगीच्या घटना, जिल्हाधिकाऱ्यांकडून फटाक्यांबाबत सर्वात मोठा निर्णय

ठाण्यात दिवाळीला गालबोट लागल्याचे दिसून आलं. ठाण्यात फटाक्यांमुळे जागोजागी आगीच्या घटना घडल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून रातोरात सर्वात मोठा निर्णय घेतला .

ठाण्यात दिवाळीला गालबोट! जागोजागी आगीच्या घटना, जिल्हाधिकाऱ्यांकडून फटाक्यांबाबत सर्वात मोठा निर्णय
thane newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 7:39 AM
Share

राज्यात दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुंबई आणि ठाण्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाण्यातील विविध ठिकाणी आग लागल्या आहेत. काल रात्री आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची एकच धावाधाव झाली. कालच्या आगीच्या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन दुर्घटनेचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्यातील वाढत्या आगीच्या घटनेवरून प्रशासन अलर्ट झालं. त्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात काल फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्यामुळे प्रशासन अलर्ट झालं. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दखल घ्यावी लागली. आगीच्या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यात हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणारे तत्सम फटाके फोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आगीच्या ११ घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला.

हवेत उडणाऱ्या फटक्यांवर बंदी 

रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना समोर आल्यानंतर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.  सार्वजनिक आणि खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारे आणि निवासी भागांमध्ये बंदी लागू करण्यात आली आहे. आता 9 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटापासून 8 जानेवारी 2027 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत बंदी लागू राहणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून फटक्यांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा