AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Gochar: पुढचे 79 दिवस या 5 राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण! गुरु देणार जबरदस्त प्रॉफिट

Jupitar Transit: गुरु ग्रह लवकरच सिंह राशीत गोचर करणार असून या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोचरामुळे 5 राशींच्या आयुष्यात पुढील 79 दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. जाणून घ्या सविस्तर

Guru Gochar: पुढचे 79 दिवस या 5 राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण! गुरु देणार जबरदस्त प्रॉफिट
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 7:12 PM
Share

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानले जाते. गुरु ग्रहाच्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतो. सध्या गुरु ग्रह सिंह राशीत विराजमान असून पुढील 79 दिवस याच राशीत राहणार आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार, गुरुचे हे गोचर 5 राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकते. या काळात काही राशींच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासोबतच नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी, जाणून घेऊया.

मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी पुढील 79 दिवस अनुकूल ठरू शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासोबतच कामातील अडथळे कमी होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चांगला समतोल राखता येईल.

कर्क राशी: गुरुचे सिंह राशीतील गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. नोकरीत येणाऱ्या अडचणी कमी होऊन कामाचे चांगले परिणाम मिळतील. वडिलांकडून आणि कुटुंबातील ज्येष्ठांकडूनही सहकार्य मिळेल.

सिंह राशी: सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे मतभेद संवादातून दूर होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.

धनु राशी: धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होतील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. त्यामुळे मन प्रसन्न राहून कामात अधिक उत्साह वाटेल.

कुंभ राशी: कुंभ राशीच्या लोकांना गुरु गोचरचा फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित अडचणी कमी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी