मोठी बातमी ! आमदाराला विमानतळावरुन अटक, पळून जाण्याचा डाव फसला, काय आहे प्रकरण?
टीएमसी पक्षाचे आमदार परेशराम दास यांना कोलकाता एअरपोर्टवरुन अटक करण्यात आली आहे. ते मुंबईला पळून जाणार होते असा दावा पोलिसांनी केला आहे.

बलात्काराचा आरोप असलेले तृणमुल पक्षाचे कॅनिंग वेस्टचे आमदार परेशराम दास यांना मुंबईला पळून जात असताना कोलकाता विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. आमदार परेशराम दास हे मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, असा पोलिसांचा दावा आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी कॅनिंग पोलीस ठाण्यात आमदार परेशराम दास यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.त्यांच्यावर बलात्कार आणि धमकीसह अनेक आरोप लावण्यात आले होते.
५ सप्टेंबर २०२६ रोजी कॅनिंग पोलीस ठाण्यात परेशराम दास यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तृणमूल आमदारावर बलात्कार आणि धमकीसह अनेक आरोप होते. काही दिवसांपूर्वी, परेशराम दास यांच्या शोधात पोलिसांचे एक पथक त्यांच्या घरीही गेले होते.परंतू त्यावेळी ते घरी सापडले नाहीत.ते फरार झाले होते. बरुईपूर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाला आज एका गुप्तबातमीदाराने कळवल्याने पोलिसांनी कोलकाता विमानतळावर छापा टाकून परेशराम दास यांना पकडले. ते मुंबईला पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
कॅनिंग पश्चिमचे आमदार परेशराम दास फरार होते. पोलीस बऱ्याच काळापासून त्यांचा शोध घेत होते. विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, बरुईपूर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाला समजले की, परेशराम दास आज कोलकाता विमानतळावरून मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे सापळा रचून असलेल्या पोलिसांनी या तृणमूल आमदाराला कोलकाता विमानतळावरून पकडले. ते मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
बॉम्बस्फोट आणि गोळीबार यांसह अनेक आरोप
२०२३ च्या पंचायत निवडणुकीदरम्यान बॉम्बस्फोट आणि गोळीबार यासह अनेक आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग पश्चिम विधानसभा मतदारसंघातून परेशराम दास सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून, त्यांनी ४०,००० हून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. या प्रकरणात सहा एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.
