AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! जय महाराष्ट्र साहेब…, ओमराजेंचा एकनाथ शिंदेंना तडकाफडकी फोन, 30 सेकंदाची ऑडिओ क्लिप, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांना फोन केला आहे. ओमराजे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील संवादाची एक तीस सेकंदांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

मोठी बातमी! जय महाराष्ट्र साहेब..., ओमराजेंचा एकनाथ शिंदेंना तडकाफडकी फोन, 30 सेकंदाची ऑडिओ क्लिप, नेमकं काय घडलं?
omraje nimbalkarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 6:58 PM
Share

धाराशिव अग्नितांडव प्रकरणात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे. नगरपालिकेसाठी अद्यायावत अग्निशमन गाड्या देण्याची मागणी ओमराजे निंबाळकर यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव द्या असं एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांना सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात एका घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरापाळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

जय महाराष्ट्र साहेब ओम बोलतोय, आमच्या धाराशिव जिल्ह्यात येडशी म्हणून एक गाव आहे, तिथे एका किराणा दुकानाला आग लागून सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, हे सर्व लोक एकाच कुटुंबातील होते, अशी माहिती यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना अशी यावेळी विनंती देखील केली की, धाराशिवच्या नगरपालिकेला अग्निशमनच्या गाड्या असणं गरजेचं आहे. दरम्यान ओमराजे यांची मागणी ऐकताच शिंदे यांनी लगेच होकार दिला, तुमची मागणी पूर्ण करतो देतो, तुम्ही फक्त नगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव पाठवा असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान या कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं आहे, सहा जणांचा मृत्यू झाला आहे, या घटनेत त्या कुटुंबातील फक्त एक मुलगा वाचला आहे. मुख्यमंत्री सहय्यता निधीमधून देखील काही मदत करावी, असंही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटलं. यावर बोलताना मी मदत करतो, असं शिंदे यांनी म्हटलं आहे, तसेच मी आता लगेच कलेक्टरला फोन करतो, असंही यावेळी शिंदे म्हणाले आहेत.

नेमकी आग कशामुळे लागली?

दरम्यान या आगीच्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत त्या कुटुंबातील फक्त एक मुलगा वाचला आहे.  दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता इन्व्हेस्टिगेशन टीमकडून सुरू आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लावलेल्या पणतीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  तपास यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड