AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes series 2021: वॉर्नरचं शतक थोडक्यात हुकलं, इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियासमोर हतबल

पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या आहेत. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर (David warner) आणि मार्नस लाबुशेनमध्ये (Marnus Labuschagne) शानदार भागीदारी झाली.

Ashes series 2021: वॉर्नरचं शतक थोडक्यात हुकलं, इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियासमोर हतबल
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 16, 2021 | 6:49 PM
Share

मेलबर्न: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ही दुसरी डे-नाईट कसोटी सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या आहेत. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर (David warner) आणि मार्नस लाबुशेनमध्ये (Marnus Labuschagne) शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली.

वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले. दुसऱ्या बाजूला मार्नस लाबुशेनची दमदार फलंदाजी सुरु आहे. तो शतकाच्या समीप पोहोचला असून ९५ धावांवर खेळत आहे. कर्णधार स्टीव स्मिथ १८ धावांवर नाबाद आहे. उद्या इंग्लंडच्या गोलंदाजानी झटपट विकेट काढल्या नाहीत, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानात जम बसवला, तर इंग्लंडसाठी कसोटी जिंकणे मुश्किल होईल.

आधीच इंग्लंड अ‍ॅशेस मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी टिच्चून मारा केला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात झाली. धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. डावखुरा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नरला इंग्लिश गोलंदाजांनी जखडून ठेवलं. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवताना एक विकेट गमावून १२९ धावा केल्या.

बटलरचा शानदार झेल ब्रॉड हॅरिसला राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. त्याने शॉर्ट पीच बॉल टाकला. त्यावर हॅरिसला पुलचा फटका खेळायचा होता. पण चेंडू ग्लोव्हजला लागून यष्टीपाठी गेला. बटलरने लगेच डाव्या बाजूला झेपावून एक अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम विकेटकिपिंग कौशल्यासाठी बटलरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

अ‍ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखंच महत्त्व अ‍ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखंच महत्त्व आहे. अ‍ॅशेसची स्वत:ची एक परंपरा आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाचे रान करतात. मालिकेतील पहिली कसोटी नऊ विकेटने जिंकून ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही तीच लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

संबंधित बातम्या 

IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं? BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा संकटात, विंडीज टीममधील पाच जणांना कोरोना

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...