AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs WI 2021: वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा संकटात, विंडीज टीममधील पाच जणांना कोरोना

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत हे खेळाडू आता सहभागी होणार नाहीत. याआधी शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि काईल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे.

PAK vs WI 2021: वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा संकटात, विंडीज टीममधील पाच जणांना कोरोना
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 7:17 PM
Share

लाहोर: पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील (west indies team) पाच जणांना कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे पाचही जण सध्या आयसोलेशन म्हणजेच विलगीकरणारमध्ये आहेत. या पाच जणांपैकी तीन खेळाडू आहेत. विकेट किपर फलंदाज शाही होप, स्पिनर अकिल हुसेल आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झालीय, तर कोचिंग स्टाफमधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत हे खेळाडू आता सहभागी होणार नाहीत. याआधी शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि काईल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली. वेस्ट इंडिजचे प्रमुख खेळाडू कोरोना बाधित आहेत, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने पाकिस्तानपुढे आधीच शरणागती पत्करली आहे. पाकिस्तान टी-20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 63 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात नऊ धावांनी विजय मिळवला. तिसरा सामना आज कराचीत होणार आहे.

संबंधित बातम्या:

दादाशी पंगा घेणारा विराट BCCI च्या फोटोंमधून गायब, हा इशारा का? IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं? BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.