AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmanpreet Kaur ऑस्ट्रेलिया विरुद्ध महारेकॉर्डसाठी सज्ज, कॅप्टन खास कामगिरी करणार?

Harmanpreet Kaur IND vs AUS : हरमनप्रीत कौर हीला आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्या 3 सामन्यांत काही खास करता आलेलं नाही. मात्र हरमनप्रीतला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही सर्व भरपाई करुन महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

Harmanpreet Kaur ऑस्ट्रेलिया विरुद्ध महारेकॉर्डसाठी सज्ज, कॅप्टन खास कामगिरी करणार?
Harmanpreet Kaur IND vs AUSImage Credit source: @ImHarmanpreet X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 11, 2025 | 9:42 PM
Share

टीम इंडिया आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 13 वा आणि आपला चौथा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया आपल्या चौथ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना रविवारी 12 ऑक्टोबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममध्ये करण्यात आलं आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीला  या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. हरमनप्रीतकडे वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. हरमनप्रीतला या विक्रमासाठी फक्त 4 षटकारांकारीच गरज आहे.

सध्या वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम हा न्यूझीलंडची फलंदाज सोफी डीव्हाईन हीच्या नावावर आहे. सोफीने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 23 षटकार लगावले आहेत. सोफीने 28 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. हरमनप्रीत या स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. हरमनने 29 सामन्यांमध्ये 20 षटकार खेचले आहेत. त्यामुळे हरमनप्रीतला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 षटकारांची गरज आहे.

हरमनप्रीतची यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी

हरमनप्रीतला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलं नाही. हरमनप्रीतला 3 सामन्यांमध्ये एकूण 50 धावाही करता आल्या नाहीत. हरमनप्रीतने 3 सामन्यांमध्ये एकूण 49 धावा केल्या आहेत. हरमनला पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र तिला त्या आकड्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आलं. हरमनप्रीतने श्रीलंकेविरुद्ध 21 आणि पाकिस्तान विरद्ध 19 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हरमनप्रीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 धावांवर आऊट झाली होती. त्यामुळे हरमनसमोर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी खेळी करण्याचं आव्हान असणार आहे.

दोन्ही संघांची एकमेकांविरूद्धची कामगिरी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स या दोन्ही संघात वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकूण 59 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 48 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर भारताला फक्त 11 सामन्यांमध्येच कांगारुंना पराभूत करता आलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भारतासाठी कायमच डोकेदुखी राहिली आहे हे या आकड्यावरुन स्पष्ट होतं.

मायदेशातील मालिकेतही पराभव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धेआधी मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय साकारला होता.

हरमनप्रीत 2017चा अॅक्शन रिप्ले दाखवणार?

भारताने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्धचा शेवटचा सामना हा 2017 साली जिंकला होता. भारताने तेव्हा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. हरमनप्रीत कौर हीने त्या सामन्यात 115 बॉलमध्ये 171 रन्स केल्या होत्या. त्यामुळे हरमनप्रीतने पुन्हा एकदा अशी खेळी करावी, अशी आशा चाहत्यांना आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?