AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZIM vs AUS : 1 मालिका आणि 3 सामने, ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

Australia Tour Of Zimbabwe 2026 : गतविजेता ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऑस्ट्रेलिया झिंबाब्वे विरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जाणून घ्या वेळापत्रक आणि ठिकाण.

ZIM vs AUS : 1 मालिका आणि 3 सामने, ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक
Australia vs Zimbabwe Image Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2026 | 7:52 AM
Share

टीम इंडिया नुकत्याच झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत चॅम्पियन ठरली. त्यानंतर टीम इंडियाचं पुढील लक्ष्य हे वनडे वर्ल्ड कप 2027 असणार आहे. टीम इंडियाचं गेल्या स्पर्धेत वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं होतं. भारताला मायदेशात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. ट्रेव्हीस हेड याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एकतर्फी आणि सहज विजय मिळवून वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर भारताला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. अशात आता क्रिकेट वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया येत्या सप्टेंबर महिन्यात झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऑस्ट्रेलिया झिंबाब्वे विरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. आयसीसी आणि झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाने एक्सद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाचा झिंबाब्वे दौरा

ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात यजमान झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिंबाब्वेकडे आहे. अशात ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाने याआधी 2018 साली झिंबाब्वे दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया तेव्हा पाकिस्तान आणि यजमान झिंबाब्वे विरुद्ध टी 20i ट्राय सीरिज खेळली होती. तसेच ऑस्ट्रेलियाने झिंबाब्वेत 12 वर्षांआधी 2014 मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर आता कांगारु लिंबुटुंब समजल्या जाणाऱ्या झिंबाब्वे विरुद्ध भिडणार आहे.

हेड टु हेड

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकूण 33 सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 33 पैकी 29 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर झिंबाब्वेला 3 सामनेच जिंकता आले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, मंगळवार, 15 सप्टेंबर

दुसरा सामना, शुक्रवार, 18 सप्टेंबर

तिसरा सामना, रविवार, 20 सप्टेंबर

झिंबाब्वे-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 20 सप्टेंबरला तिसऱ्या आणि अंतिम सामन्याने मालिकेची सांगता होईल. तर दुसरा क्रिकेट सामना हा 18 सप्टेंबरला होणार आहे. उभयसंघातील तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. हे सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा