AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India, 1st Test, Day 2 : लाबुशेनला दोनदा जीवदान, बुमराह-साहाची घोडचूक महागात?

मार्नस लाबुशानेला 4 आणि 12 धावांवर जीवनदान मिळालं.

Australia vs India, 1st Test, Day 2 : लाबुशेनला दोनदा जीवदान, बुमराह-साहाची घोडचूक महागात?
| Updated on: Dec 18, 2020 | 2:02 PM
Share

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात (Australia vs India 1st Test) अ‌ॅडिलेड ओव्हल येथे बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिसा सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा केल्या. यानंतर फलंदाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आला. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीला माघारी पाठवत चांगली सुरुवात मिळवून दिली. बुमराहने मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामी जोडीला एलबीडबल्यू आऊट केलं. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेला मार्नस लाबुशाने नशिबवान ठरला. त्याला टीम इंडियाने 2 वेळा बाद करण्याची संधी सोडली. अर्थात मार्नसला 2 जीवनदान मिळाले. मार्नस लाबुशानेला 4 आणि 12 धावांवर जीवनदान मिळालं.  यामुळे ही चूक टीम इंडियाला किती महागात पडणार, हे लवकरच समजेल. Australia vs India 1st Test Bumrah and Wriddhiman Saha gave life to 2 times Marnus Labuschagne

नक्की काय झालं?

मार्नसला आधी विकेटकीपर ऋद्धीमान साहा तर दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराहने जीवनदान दिलं. मॅथ्यू वेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला. वेड 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आऊट झाला. वेडनंतर मार्नस मैदानात आला. मार्नस मैदानात आला तेव्हा तो दबावात वाटत होता. याचाच फायदा बुमराहने घेतला. बुमराहने 15 व्या ओव्हरचा चौथा चेंडू टाकला. बुमराहने टाकलेला चेंडू मार्नसच्या बॅटला लागून विकेटकीपर ऋद्धीमान आणि पहिल्या स्लीपमध्ये असलेल्या विराटच्या दिशेने गेला. मात्र हा कॅच घेण्यात दोनही अपयशी ठरले. त्यामुळे मार्नसला पहिलं जीवनदान मिळालं.

मार्नसला यानंतर सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये दुसरा जीवनदान मिळालं. मार्नसने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर लेग साईडला उंच शॉट खेचला. सीमारेषेवर बुमराह उभा होता. बुमराहने कॅचचा वेध घेतला. मात्र बुमराहच्या हातून कॅच निसटला. त्यामुळे मार्नसला दुसरा जीवनदान मिळाला. दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार मार्नस 43 धावांवर खेळतोय.  त्यामुळे टीम इंडियाला एकाच फंलदाजाच्या दोन कॅच सोडणं किती महागात पडेल हे लवकरच समजेल.

संबंधित बातम्या :

Virat Kohli | अर्धशतकांचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा, कोहलीची ‘विराट’ खेळी

Australia vs India, 1st Test, Day 2 : ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, ट्रॅव्हिस हेड आऊट

Australia vs India 1st Test Bumrah and Wriddhiman Saha gave life to 2 times Marnus Labuschagne

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.