Virat Kohli | अर्धशतकांचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा, कोहलीची ‘विराट’ खेळी

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या डावात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या.

Virat Kohli | अर्धशतकांचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा, कोहलीची 'विराट' खेळी
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:24 PM

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‌ॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी (Australia vs India 1st Test) सामना खेळण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा (18 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. टीम इंडियाने पहिला डावात सर्वबाद 233 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक धावा केल्या. विराटने सामन्याच्या पहिल्या दिवशी विराटने 180 चेंडूत 8 चौकारांसह 74 धावा केल्या. विराट अजिंक्य रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला. त्यामुळे विराटची शतकाची संधी हुकली. मात्र विराटने अर्धशतकी खेळीसह अनेक विक्रम केले आहेत. Australia vs India 1st Test Team India Captain Virat Kohli Break many Records With Half Century

काय आहेत विक्रम?

विराटने अर्धशतकी खेळी केली. हे अर्धशतक विराटच्या कसोटी कारकिर्दीतील 23 अर्धशतक ठरलं. तर अ‌ॅडिलेड ओव्हलमध्ये अर्धशतक लगावण्याची ही चौथी वेळ ठरली. विराटने अ‌ॅडिलेडमध्ये जेव्हा जेव्हा अर्धशतकी खेळी केली, तेव्हा तेव्हा त्याने शतक झळकावलं आहे. मात्र पहिल्यांदा तो अ‌ॅडिलेडमध्ये शतक लगावण्यापासून वंचित राहिला.

सहाव्यांदा अर्धशतकी भागादारी

विराट आणि अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी होण्याची ही सहावी वेळ ठरली. या दोघांनी मेलबर्नमध्ये (2014-15) मध्ये 262 धावांची भागीदारी केली होती. ही चौथ्या विकेटसाठी भागीदारी करण्यात आली होती. तसेच या दोघांनी याआधी अ‌ॅडिलेडमध्येही शतकी भागीदारी केली होती.

अ‌ॅडिलेडमध्ये 500 धावा

विराटच्या 74 धावांसह अ‌ॅडिलेड ओव्हलमध्ये 500 धावांचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे या 500 धावा करताना त्याने 3 शतकं लगावली आहेत. विराट परदेशातील मैदानावर 500 धावा करणारा विराट सहावा भारतीय फलंदाज ठरला.

मन्सूर पतौडी यांचा रेकॉर्ड ब्रेक

विराटने टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर पतौडी यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. पतौडी यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात 829 धावा केल्या आहेत. तर ताज्या आकडेवारीनुसार विराटच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरोधात कर्णधार म्हणून 851 धावा आहेत.

अर्धशतकाचं अर्धशतक

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील या अर्धशतकासह अनोखी कामगिरी केली. विराटने कसोटीमध्ये अर्धशतकांच अर्धशतक पूर्ण केलं. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरोधातील अर्धशतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 50 वं अर्धशतक ठरलं. अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय बॅट्समन ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरोधात हे 13 वं अर्धशतक ठरलं.

दुसऱ्यांदा रनआऊट

विराट मैदानात वेगात धावतो. फलंदाजी करताना त्याचा हा वेग आणखी दुप्पट होतो. विराट सहसा रनआऊट होत नाही. मात्र विराट दुर्देवाने रनआऊट झाला. कसोटीमध्ये विराट रनआऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. विशेष म्हणजे विराट पहिल्यांदा अ‌ॅडिलेडमध्येच (2011-12) रनआऊट झाला होता.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, पाहा आकडेवारी

IND VS AUS | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, स्टार्कच्या बोलिंगवर दुखापत, रक्त आलं तरी विराट खेळतच राहिला!

Australia vs India, 1st Test, Day 1 : विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा

Australia vs India 1st Test Team India Captain Virat Kohli Break many Records With Half Century

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.