AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India, 1st Test | विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, पाहा आकडेवारी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात अ‌ॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक (गुलाबी) चेंडूने खेळला जात आहे.

Australia vs India, 1st Test | विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, पाहा आकडेवारी
| Updated on: Dec 17, 2020 | 12:40 PM
Share

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia 2020) यांच्यात अ‌ॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येतोय. हा सामना पिंक (गुलाबी) चेंडूने (Pink Bowl Test) खेळण्यात येत आहे. तसेच हा सामना डे-नाईट आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने गेला. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने टॉस जिंकल्याने हा सामना टीम इंडिया जिंकेल, असं आम्ही नाही तर खुद्द आकडेवारी असं म्हणतेय. Team India Captain Virat Kohli win the toss 26 times to 2015 in test match

नक्की भानगड काय?

विराटने टीम इंडियासाठी 2015 पासून ते आतापर्यंत (अ‌ॅडिलेड टेस्ट)  म्हणजेच 2020 मध्ये एकूण 26 वेळा टॉस जिंकला आहे. या 25 पैकी 21 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 4 सामने हे अनिर्णित राहिले. म्हणजेच विराटने जेव्हा जेव्हा टॉस जिंकला तेव्हा तेव्हा टीम इंडियाचा विजय झाला आहे. किंवा सामना अनिर्णित राहिला आहे.

डे-नाईट सामन्यातील कामगिरी

आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया हे दोन्ही संघ पिंक (गुलाबी) चेंडूने खेळलेल्या सामन्यात पराभूत झालेले नाहीत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूने 7 सामने खेळले आहेत. हे 7 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर टीम इंडिया 2019 मध्ये बांगलदेशविरोधात गुलाबी चेंडूने खेळली होती. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर एका डावाने विजय मिळवला होता. त्यामुळे अॅडिलेडमधील सामन्यात विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी कितपत लाभदायक ठरतं हे पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहेत.

पहिल्या कसोटीनंतर मायदेशी

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कर्णधार विराट या मालिकेतील पहिला सामन्यातच खेळणार आहे. यानंतर तो मायदेशी परतणार आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. लवकरच ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे. अशा क्षणी विराट आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. यासाठी बीसीसीआयने विराटला पितृत्वाची रजा मंजूर केली आहे. दरम्यान विराटच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळू शकते.

पहिल्या सामन्यासाठी टीम आस्ट्रेलिया: जो बर्नस, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरन ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.

अशी आहे टीम इंडिया : मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ​ऋ​द्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

संबंधित बातम्या :

Dream 11 वर फेव्हरेट टीम कशी निवडतात, पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या एका क्लिकवर

Team India Captain Virat Kohli win the toss 26 times to 2015 in test match

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.