AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ

बांग्लादेश संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसनने काही महिन्यांआधीच आयसीसीने लावलेल्या बॅनमधून पुनरागमन केले होते.

Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ
शाकिब अल हसन
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 11:00 AM
Share

ढाका : क्रिकेटच्या मैदानात चुरस, स्पर्धा हे सर्व दिसतच असतं. मात्र एखादा खेळाडू रागाच्या भरात स्टंपला लाथ मारतो किंवा स्टंप काढून फेकून देतो, असे सहसा होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंकडून असे कृत्य तर कोणी अपेक्षित ही करत नाही. मात्र बांग्लादेशचा माजी कर्णधार अष्टपैलू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) असेच कृत्य बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लीगमध्ये (Dhaka Premier League) केले आहे. अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे खुश नसलेल्या शाकिबने थेट स्टंपलाच लाथ मारली. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा पंचाशी वाद झाल्यानंतर थेट स्टंप जमिनीतून काढून फेकून दिले. (Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Gets Angery on Umpire Decision And Kicks Stumps In Live Match At Dhaka Premier League 6)

बांग्लादेश येथे सुरु असलेल्या ढाका प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी 11 जूनला मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहनी लिमिटेड (Mohammedan Sporting vs Abahani Limited) या दोन संघात सामना होता. सुरुवातीपासूनच हलक्या पावसांच्या सरीमुळे सामन्यात व्यत्यय येईल असे वाटत होते. पण व्यत्यय पावसामुळे नाही तर, दुसऱ्याच गोष्टीने आला. मोहम्मडन संघाचा कर्णधार शाकिबला राग अनावर झाल्याने त्याने चालू मॅचमध्ये स्टंपला लाथ मारली तर दुसऱ्या वेळेस स्टंप उखाडून फेकून दिले.

अंपायरचा निर्णय अमान्य

सर्वात आधी पाचव्या ओव्हरमध्ये शाकिबने शेवटच्या बॉलवर एलबीड्ब्लूची अपील केली. त्यावर अंपायरने फलंदाजाला नॉटआउट करार दिलं. ज्यामुळे शाकिबला राग अनावर झाला आणि त्याने अंपायर समोर जात स्टंपवर लाथ मारली आणि अंपायरशी वाद घालू लागला. हा किस्सा घडतो न घडतो तोच लगेच नंतरच्या ओव्हरला पाऊस आल्याने अंपायरने खेळ थांबवण्याचा इशार दिला. ज्यामुळे पुन्हा शाकिब भडकला आणि त्याने अंपायर जवळ जात तिन्ही स्टंप जमिनीतून काढून फेकून दिले. त्यानंतर एक स्टंप पुन्हा जमिनीत रोवला. ढाका प्रिमियर लीगचे सामने यूट्यूब आणि फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम होत असल्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच शाकिबवर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे.

सोशल मीडियाद्वारे मागीतली माफी

या संपूर्ण घटनेनंतर शाकिबने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहित माफी मागीतली आणि लिहिलं मी प्रयत्न करेन की माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही. त्याने लिहिलं, “मी अशाप्रकारे राग व्यक्त करुन घरी बसून सामना पाहणाऱ्यांची मजा खराब केल्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते. माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूने असं कृत्य करण बरोबर नव्हतं. पण अनेकदा चूकीच्या परिस्थितीत दुर्देवानं असं होतं. मी संघ, व्यवस्थापन आणि सर्व अधिकाऱ्यांची माफी मागतो. भविष्यात असं काही होणार नाही याची मी काळजी घेईन.”

हे ही वाचा :

IND vs SL : कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिखर धवनचं पहिलं ट्विट, म्हणतो, ‘देशाचं नेतृत्व करताना…’

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!

(Bangladesh Cricketer Shakib Al Hasan Gets Angery on Umpire Decision And Kicks Stumps In Live Match At Dhaka Premier League 6)

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?