AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!

BCCI ने जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. संघात मराठमोळे खेळाडू पुणेकर ऋतुराज गायकवाड (RutuRaj Gaikwad) आणि मुंबईकर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) यांची निवड करण्यात आलेली आहे. | India Tour of Sri Lanka RutuRaj Gaikwad And Prithvi Shaw

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, IPL मध्ये जलवा दाखवणाऱ्या या 2 मराठमोठ्या खेळाडूंना संधी!
Team India
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 11, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे (Indian Squad For Sri Lanka Tour). काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. या संघात मराठमोळे खेळाडू पुणेकर ऋतुराज गायकवाड (RutuRaj Gaikwad) आणि मुंबईकर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) यांची निवड करण्यात आलेली आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर या दोन्ही खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराजने चेन्नईकडून खेळताना आपल्या बॅटिंगची प्रतिभा आणि क्षमता दाखवून दिली तर पृथ्वीने दिल्लीकडून खेळताना सेहवागनंतरचा ओपनर फलंदाज कसा असावा, याचं प्रात्याक्षिक त्याने खेळलेल्या आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात दाखवून दिलं. क्षीलंका दौऱ्यात या खेळाडूंवर आता मोठी जबाबदारी असेल. (Maharashtrian Player RutuRaj Gaikwad And Prithvi Shaw Selected Indian Squad For Sri Lanka Tour)

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या नियमित सदस्यांशिवाय भारतीय संघ श्रीलंका दोऱ्यावर जात आहे. शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहेत.  याआधी त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं आहे. आता प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.

चेन्नईकडून ऋतुराजचा जलवा

ऋतुराज गायकवाड…. मराठमोळ्या ऋतुराजने आयपीएलच्या मोसमात आपल्या बॅटची जादू क्रिकेट रसिकांना दाखवून दिलीय. ऋतुराजने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सलग 3 अर्धशतक ठोकत आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. ऋतुराजने या 14 व्या मोसमातील 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 25 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 196 धावा केल्या. चेन्नईचा आक्रमक ओपनर बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. धोनीचा आणि संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वास आहे. म्हणून तर आय़पीएलच्या 14 व्या मोसमातील सुरुवातीच्या दोन-तीन सामन्यात अपयश येऊन देखील संघ व्यवस्थापनाने आणि कर्णधार धोनीने त्याला खेळण्याची संधी दिली आणि त्यानेही पुढच्या तीन मॅचेसमध्ये दोन अर्धशतकं ठोकत धोनीचा आणि संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

पृथ्वी शॉ ची धमाकेदार खेळी

मुंबईकर पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले. त्याला जशीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याने तिथंही आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. आयपीएलच्या 14 व्या मोसमात तर त्याने कमाल केली. दिल्लीकडून खेळताना पृथ्वीने दाखवून दिलं की सेहवागनंतरचा ओपनर फलंदाज कसा असावा… त्याने सुरुवातीच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवली. चौकार आणि षटकारांची लयलूट केली. त्याच्या या कामगिरीने अनेक दिग्गज त्याच्यावर भाळले. अनेकांनी त्याला उद्याच्या भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हटलं.

मराठमोळ्या ऋतुराज आणि पृथ्वीवर मोठी जबाबदारी

भारतीय संघाचा आता मराठमोळ्या ऋतुराज आणि पृथ्वीवर मोठी जबाबदारी असणार आहे. अनेक सिनिअर खेळाडू संघात उपस्थित नसताना श्रीलंका दौऱ्यात या दोन खेळाडूंना आपल्या बॅटिंगने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. तसंच मिळालेल्या संधीची फायदाही उठवावा लागेल.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

(Maharashtrian Player RutuRaj Gaikwad And Prithvi Shaw Selected Indian Squad For Sri Lanka Tour)

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?