IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?

भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेली घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी संघ जाहीर केला आहे.

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, कर्णधारपद कोणाकडे?
Team India
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 11:22 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेली घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी संघ जाहीर केला आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. (Indian Squad For Sri Lanka Tour Announced, Shikhar Dhawan To Captain The Side)

गेल्या काही मोसमांमधून आयपीएलमध्ये (IPL) उत्तम कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर, गेल्या दोन मोसमात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या युवा फलंदाजांनादेखील संघात स्थान मिळालं आहे.

नव्या संघामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया (Chetan Sakariya) यालादेखील स्थान देण्यात आलं आहे. साकरियाने यंदा राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि अवघ्या 7 सामन्यांनंतर त्याला थेट भारतीय संघाकडून बोलावणं आलं आहे. याशिवाय अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमदेखील (K Gowtham) संघात दाखल झाला आहे, तर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि नवदीप सैनी यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

धनवला पहिल्यांदा संघाचं नेतृत्व करण्याची संधी

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांसारख्या नियमित सदस्यांशिवाय भारतीय संघ श्रीलंका दोऱ्यावर जात आहे. शिखर धवन पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहेत. याच वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडक स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व केले होतं. तो भारतीय संघात सर्वात वरिष्ठ सदस्य आहे. त्याच्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल हे संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये आहेत.

कुलदीप-चहलची जोडी पुन्हा दिसणार?

या मालिकेदरम्यान भारतीय संघात पुन्हा एकदा कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलची जोडी एकत्र पाहायला मिळू शकते. कुलदीपला नुकत्याच पार पडलेल्या काही मालिकांनंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या संघातून वगळण्यात आलं होतं. तरीदेखील त्याला पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. तथापि, कुलदीपला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीकडून जोरदार टक्कर मिळू शकते. चक्रवर्तीची याआधी दोनदा संघात निवड झाली होती, परंतु फिटनेसच्या कारणास्तव त्याला संधी गमवावी लागली होती.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

इतर बातम्या

‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

(Indian Squad For Sri Lanka Tour Announced, Shikhar Dhawan To Captain The Side)

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.