AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

भारतीय संघात कसोटी सामन्यांत सर्वांच्या आशा टिकून असतात ते मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane). रहाणेने 2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय संघात आणि दोन वर्षांनी कसोटी संघात पदार्पण केले होते.

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली
team india captain ajinkya rahane take perfect decision in boxing day test against australia
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 3:46 PM
Share

चेन्नई : भारतीय संघाचा सर्वांत विश्वासू फलंदाज ज्याला The Wall नावाने संबोधलं जातं अशा राहुल द्रविडने (Rahul Dravid) सध्या संघात असणाऱ्या अनेक खेळाडूंना घडवलं आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ही यांचपैकी एक असून त्याचा खेळ सुधारण्यापाठी राहुल द्रविड़ची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्याने सांगितलं. (How Rahul Dravid Words Affect Ajinkya Rahane To become Run Machine)

रहाणेने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान द्रविडबरोबरच्या 2008-09 मधील संभाषणाबाबत सांगितलं. अजिंक्य रहाणेचे तेव्हा भारतीय संघात सिलेक्शन झाले नव्हते. तो तेव्हा दलीप ट्रॉफी खेळत होता. तेव्हा रहाणे वेस्ट जोन संघाकडून खेळत होता तर द्रविड साउथ जोन संघात होता. रहाणेने अंतिम सामन्यात 165 आणि 98 धावा केल्या होत्या. त्या सामन्यानंतर द्रविड रहाणेला म्हणाला, ”मी तुझ्याबद्दल बरच ऐकलंय. तू बऱ्याच धावा करत आहेस. त्यामुळे तुला आता भारतीय संघातून बोलवण्याची आशा आहे. पण मी फक्त इतकच सांगू इच्छितो की, जसा खेळतोयस तसाच खेळ. तू तुझ्या खेळावर लक्ष दे तुला आपोआप भारतीय संघातून बोलवलं जाईल.” द्रविडच्या या शब्दांमुळे मला कमालीची प्रेरणा मिळाली असं रहाणेने सांगितले. तसंच त्या सिरीजनंतर 2 वर्षांतच रहाणेला भारतीय संघात निवडण्यात आले.

निराशाजनक सुरुवातीनंतर मिळालं यश

अजिंक्य रहाणेने 2011 मध्ये इंग्लंड दौऱ्यावेळी भारतीय संघात पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बऱ्याच धावा केल्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं होत. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुरुवातीला रहाणेचं प्रदर्शन खास नव्हत. अशावेळी प्रवीण आमरे यांनी मदत केल्याचंही रहाणेने सांगितलं. रहाणे म्हणला,”रणजी ट्रॉफीचे माझे सुरुवाचीचे 3-4 सामने खराब गेले होते. मला संघातून कमी करण्याची चर्चा होऊ लागली. पण आमचे कोच प्रवीण आमरे यांनी आपण एखाद्याला संघात घेतलंय तर 7-8 मॅच करी खेळी दिल्या पाहिजेत असं सांगितलं. त्यानंतर माझे सर्व सामने चांगले गेले. त्यानंतर 5 सीजन मी 1000 धावा केल्या.

हे ही वाचा :

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(How Rahul Dravid Words Affect Ajinkya Rahane To become Run Machine)

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...