AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yash: इंटिमेट सीन्स करणं तर चुकीचंच; TOXIC मधील किसिंग सीन चर्चेत येताच यशचा यूटर्न

Yash Toxic Movie: टॉक्सिक या चित्रपटामुळे अभिनेया यथ खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स आणि इंटिमेट सीन्स या दोन्हींनी लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात पाच अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

Yash: इंटिमेट सीन्स करणं तर चुकीचंच; TOXIC मधील किसिंग सीन चर्चेत येताच यशचा यूटर्न
| Updated on: Aug 15, 2026 | 12:08 PM
Share

टॉक्सिक या चित्रपटामुळे अभिनेया यथ खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स आणि इंटिमेट सीन्स या दोन्हींनी लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात पाच अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. तारा सुतारिया आणि कियारा अडवाणी यांची सर्वाधिक चर्चा होत आहे, कारण या दोघींसोबत यशची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते. या दोन अभिनेत्रीसोबत यशचे इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. आता यश नुकताच आपकी अदालत मध्ये सामील झाला होता. यात यशने एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा होत आहे.

‘टॉक्सिक’ हा एक गँगस्टर ड्रामा असून, त्याला सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात कियारा आणि तारा सुतारिया यांच्यासोबत हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंता आणि नयनतारा यांच्याही भूमिका आहेत.  अभिनेता यशने नुकतेच ‘आप की अदालत’वर त्याच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवरून होणाऱ्या टीकेबद्दल उघडपणे भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “अश्लीलता चुकीचीच आहे. मी किससुद्धा केलेला नाही. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल.”

तो पुढे म्हणाला, “मला एक मर्यादा माहीत आहे. तुम्हाला सौंदर्यदृष्ट्या चित्रीकरण करावं लागतं, आणि नंतर जे दृश्य आकर्षक दिसतं, तोच सिनेमाचा प्रभाव असतो. तो एका निर्मात्याचा आवाज असतो.” अभिनेता यशने हेही स्पष्ट केले की, हा चित्रपट एका विशिष्ट उद्देशाने बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये इमोशन महत्त्वाची भूमिका बजावते. तो म्हणाला की, “चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपट निर्मात्याचा दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे समजेल.”

‘टॉक्सिक’ कधी प्रदर्शित होणार?

‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात विविध भाषांमध्ये प्रदर्शित होईल. वृत्तानुसार, यश या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. याची निर्मिती व्यंकट के. नारायण यांच्या केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि यशच्या प्रॉडक्शन बॅनर, मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांनी संयुक्तपणे केली आहे.

रामायण चित्रपटात ‘रावण’च्या भूमिकेत

‘टॉक्सिक’ ही यशची सर्वाधिक अपेक्षित मुख्य भूमिका असून, हा अभिनेता यावर्षी ‘रामायण 1’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमधील त्याच्या भूमिकेला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट भारतात 8 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.

Follow Us
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?