Marathi News Photo gallery Chetan sakariya ruturaj gaikwad harshal patel and avesh khan all performed brilliantly in the 14th season of ipl
PHOTO | नवे आहेत पण छावे आहेत ! आयपीएलच्या 14 व्या मोसमात युवा खेळाडूंसमोर दिग्गजांचं लोटांगण
आयपीएलचा 14 वा (IPL 2021) मोसमात युवा खेळाडूंनी (Young Players) उल्लेखनीय कामगिरी केली.
sanjay patil |
Updated on: May 05, 2021 | 11:11 PM
Share
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करण्यात आला. या मोसमातील एकूण 60 सामन्यांपैकी 29 सामने खेळवण्यात आले. आता उर्वरित सामन्यांबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. मात्र या 29 सामन्यात भारतातील युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. बॅटिंग आणि बोलिंग या 2 आघाड्यांवर युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली. हे खेळाडू नक्की कोण आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1 / 5
चेतन साकरिया. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत या सौराष्ट्राच्या खेळाडूने शानदार गोलंदाजी केली. या कामगिरीच्या जोरावर 1 कोटी मोजून राजस्थानने रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. चेतनने राजस्थानचा हा निर्णय योग्य ठरवला. चेतनने 7 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या.
2 / 5
ऋतुराज गायकवाड. मराठमोळ्या ऋतुराजने या मोसमात बॅटने धमाका केला. ऋतुराजने गेल्या मोसमात सलग 3 अर्धशतक ठोकत आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. ऋतुराजने या 14 व्या मोसमातील 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 25 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 196 धावा केल्या.
3 / 5
हर्षल पटेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सच्या खेळाडूला 20 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. हर्षल 29 सामन्यांपर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. हर्षलने या मोसमातील 7 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यासह हर्षल आयपीएल्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
4 / 5
आवेश खान. दिल्ली कॅपिट्ल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या बोलरने 8 मॅचमध्ये 14 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आवेश हर्षलनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.