AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण, भारतासाठी धोक्याची घंटा

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. यातील एक खेळाडू भारतासाठी मोठा धोका ठरु शकतो.

इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण, भारतासाठी धोक्याची घंटा
इंग्लंड कसोटी संघ
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 11:48 AM
Share

लंडन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वातील ही पहिलीच मालिका असल्याने दोन्ही संघ कसून सराव आणि उत्तम रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. भारतीय संघाकडे उत्तम दर्जाचे खेळाडू असले तरी इंग्लंड संघाकडेही काही दिग्गज खेळाडू आहेत. यामध्ये दोन वेगवान गोलंदाज भारतासाठी सर्वात मोठा धोका आहेत. ते म्हणजे जेम्‍स एंडरसन आणि स्‍टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad). युवराज सिंगने एका षटकात 6 षटकार ठोकणाऱ्या ब्राॉडने मागील काही वर्षात उत्कृष्ठ खेळ दाखवत इंग्लंड संघात मानाचं स्थान मिळवलं. त्याने आजच्याच दिवशी म्हणजे 28 जुलै, 2020 रोजी टेस्‍ट क्रिकेटमध्ये तब्बल 500 विकेट पूर्ण केले होते.

ब्रॉडने ही कामगिरी 24 ते 28 जुलै, 2020 दरम्यान मॅनचेस्‍टर येथे इंग्‍लंड आणि वेस्‍टइंडीज (England vs West Indies) यांच्यात पार पडलेल्या कसोटी साम्यादरम्यान केली होती. इंग्‍लंडने प्रथम फलंदाजी करत 369 धावा केल्या. ओली पोपने 91 धावा केल्या.तर जॉस बटलरने 67 धावा केल्या. रोरी बर्न्‍सने ही 57 धावा करत अर्धशतक ठोकलं. यावेळी स्‍टुअर्ट ब्रॉडने 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 62 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट विंडीज संघाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. यावेळी ब्रॉडने तब्बल 6 विकेट घेतल्या तर एंडरसनने 2 बळी घेतले. दुसऱ्या डावातही ब्रॉडने चार बळी घेत टेस्‍ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण केले. त्याने क्रेग ब्रॅथवेट याला बाद करत 500 विकेट पूर्ण केले.  ब्रॉडने आतापर्यंत 148 टेस्‍टमध्ये 523 विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे चांगल्या फॉर्ममध्ये असणारा ब्रॉड भारतीय फलंदाजासाठी मोठा धोका असणार हे नक्की.

इंग्लंडचा संघ –

जो रूट (कप्तान), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिनसन, हसीब हमीद, डॉम सिबले, डॅन लॉरेंस, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वुड.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा

IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, ‘हे’ दोन खेळाडू होणार संघातून बाहेर

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(Before england vs india match england bowler stuart broad took 500th test wicket against west indies on this day)

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती