AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून इंग्लंडच्या नॉटिंगहम येथे सुरु होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या खेळाडूंची नाव नुकतीच जाहीर केली आहेत.

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
कर्णधार जो रुटच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड भारताशी भिडणार आहे.
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 6:24 PM
Share

लंडन : भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध (Indian Cricket Team) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड क्रिकेट संघाने (England Cricket Team) आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधार जो रूटच्या नेतृत्त्वाखाली 17 सदस्यीय संघाची घोषणा नुकतीच केली असून यामध्ये चार दिग्गज खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन अशी या चौघांची नावं आहेत. यासोबतच वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसन यालाही संघात स्थान देण्यात आलं असून न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट डेब्यू करणारा ऑली काही वादग्रस्त ट्विट्समुळे निलंबित होता. त्याच्यावर वर्णभेदी आणि महिलांविरोधी ट्विट केल्याचा आरोप होता.

इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या संघात दोन फिरकीपटूंसह पाच वेगवान गोलंदाज सामिल आहेत. इंग्लंड संघाने फेब्रुवारी-मार्चमध्ये भारताचा दौरा केला होता. दरम्यान या संघात इंग्लंडचे महत्त्वाचे खेळाडू जोफ्रा आर्चर आणि क्रिस वॉक्स यांना स्थान दिलं गेलेलं नाही. याचे कारण आर्चर याला नुकतीच दुखापत झाली होती. तर वॉक्सही दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच यष्टीरक्षक बेन फोक्स आणि वेगवान गोलंदाज ऑली स्टोन ही पहिल्या दोन टेस्टसाठी संघात नसतील.

इंग्लंडचा संघ –

जो रूट (कप्तान), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिनसन, हसीब हमीद, डॉम सिबले, डॅन लॉरेंस, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वुड.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

ऋषभ पंतच्या कोरोनाबाधित होण्यामागील सत्य आलं समोर, Euro सामना नाही, तर ‘या’ ठिकाणी झाली कोरोनाची बाधा

(For India vs england test england named 17 players Squad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.