AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chetan Sakariya: चेतन सकारियाचं करिअर अडचणीत! ‘त्या’ चुकीमुळे सर्वकाही लागलं होतं पणाला, पण…

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. यासाठी खेळाडूंची लिस्ट जारी करण्यात आली आहे. पण काही खेळाडूंच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. त्यात चेतन सकारियाचं नाव असल्याने खळबळ उडली होती. मात्र बऱ्याच उलथापालथीनंतर खरं काय ते समोर आलं आहे. मात्र चेतन सकारियाला नाहक त्रास सहन करावा लागला, तितकंच खरं आहे.

Chetan Sakariya:  चेतन सकारियाचं करिअर अडचणीत! 'त्या' चुकीमुळे सर्वकाही लागलं होतं पणाला, पण...
Chetan Sakariya: चोर सोडून संन्याशाला फाशी! त्या चुकीचा चेतन सकारियाला मानसिक त्रास, झालं असं की...
| Updated on: Dec 16, 2023 | 4:57 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेचे वारे वेगाने वाहू लागलेत. खेळाडूंची अदलाबदलीपासून कर्णधारपद वगैरे बऱ्याच बातम्यांनी आयपीएल चर्चेत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मिनी लिलाव होणार आहे. यासाठी सर्व फ्रेंचायसी सज्ज झाल्या आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने एक लिस्ट जारी केली त्यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. या लिस्टमधील खेळाडूंच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. यात नवोदित खेळाडू चेतन सकारिया याचंही नाव असल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून रिलीज केलेल्या चेतन सकारियाचं नाव या यादीत पाहून चर्चांना उधाण आलं. चेतनच्या गोलंदाजी शैलीत नेमक्या काय त्रुटी आहेत याबाबत खलबतं सुरु झाली. मात्र बऱ्याच कालावधीनंतर बीसीसीआयला संदर्भ लागला आणि त्यांनी क्रॉस चेक केलं त्यानंतर खरं काय ते समोर आहे. खऱ्या अर्थाने चोर सोडून संन्याशाला फाशी असंच काहीसं म्हणावं लागेल.

चेतन सकारिया मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. मात्र 2024 पर्वापूर्वी सकारियाला रिलीज केलं आहे. 19 डिसेंबरला होणाऱ्या लिलावाच्या रोस्टरमध्ये 27व्या स्थानावर असेल. त्याची बेस प्राईस 50 लाख रुपये असेल. एकाच नावामुळे बीसीसीआयकडून चूक झाल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकच्या चेतन नावाच्या गोलंदाजाच्या जागी सौराष्ट्राच्या चेतन सकारियाचं नाव यादीत टाकलं गेलं. गोंधळाचं वातावरण शमवण्यासाठी बीसीसीआयने चूक दुरूस्त केली आणि चेतन सकारियाचं नाव यादीतून दूर केलं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

“हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे. चेतनला चुकीच्या शैलीसाठी कधीही बोलवलं गेलं नाही. त्याचं नाव या यादीत नाही. खरं तर त्याचं नाव चुकून आलं. पण त्याच्या ऐवजी कर्नाटकच्या गोलंदाजाचं नाव असायला हवं. आयपीएल फ्रेंचायसींना याबाबतची माहिती दिली जात आहे.” असं जयदेव शाह यांनी सांगितलं.

चेतन सकारिया आतापर्यंत 19 आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने 20 गडी बाद केले आहेत. 31 धावा देत 3 गडी बाद ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर आयपीएलमध्ये 7 डावात खेळण्याची संधी मिळाली आहे. यात त्याने एकूण 20 धावा केल्या आहेत.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.