AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरीकेत भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम, पण त्या स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव का?

मागील काही वर्षात अमेरिका देश क्रिकेट या जगप्रसिद्ध खेळात आपलं नाव करत आहे. अमेरिकेचा गोलंदाज अली खान हा देखील आयपीएलमधून केकेआर संघाकडून खेळला होता.

अमेरीकेत भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम, पण त्या स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव का?
अमेरिकेतील क्रिकेट मैदान
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 11:44 PM
Share

वॉशिंग्टन : मागील काही वर्षात अमेरिका हा देशही क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत आहे. काही वर्षांपूर्वी दूरदूरवर अमेरिका देशाचा क्रिकेट खेळाशी काहीच संबध नव्हता. महासत्ता असलेल्या अमेरिकेला क्रिकेटमध्ये मात्र आपला झेंडा फडकवता येत नव्हता. पण आता मात्र अमेरिका देशाचा क्रिकेट संघ (America Cricket team) उदयास येत आहे. अशाच वेळी अमेरिकेत क्रिकेटचं एक भव्य क्रिकेट स्टेडियमही पाहायला मिळणार आहे. अमेरिकेतील टेक्सास स्थित एनजीओ इंडिया हाऊस ह्यूस्टननं (India House Houston) या क्रिकेट स्टेडियमचं उदघाटन केलं.

या मैदानाची विशेष गोष्ट म्हणजे या स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव देण्यात आलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल अमेरिकेतील मैदानाला भारतीयाचं नाव का? तर नाव देण्यात आलेल्या डॉ. दुर्गा अग्रवाल (Dr. Durga Agarwal) आणि सुशीला अग्रवाल (Sushila Agarwal) यां दोघीही भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. डॉ. दुर्गा अग्रवाल या पिपिंग टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्ट्सच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. याशिवाय त्या इंडिया हाऊसच्या संस्थापक सदस्य आणि ट्रस्टी देखील आहेत. अमेरिकेत क्रिकेट या खेळाला प्रसिद्ध करण्यात या दोघींनी बराच हातभार लावला आहे. त्यामुळेच त्यांच नाव या मैदानाला देण्यात आलं आहे. या मैदानाचं उद्घाटन मागील आठवड्यात करण्यात आलं. पण कोरोनाचे संकट असल्याने मोठा समारंभ करण्यात आला नाही.

अमेरिकन क्रिकेटमध्ये भारतीयांचा बोलबाला

अमेरिका क्रिकेट संघ मागील काही वर्षात चांगलाच तगडा होत आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे अनेक भारतीय वंशाचे किंवा भारतात आधी क्रिकेट खेळेलेल क्रिकेटपटू आहेत. यामध्ये भारताचा अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणारा  उन्मुक्त सिंग (unmukt singh) याचाही समावेश आहे. अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता यावे यासाठी भारतीय क्रिकेटमधून त्याने काही महिन्यांपूर्वीच संन्यास घेतला होता. याशिवाय मुंबईचा हरमीत सिंग हाही अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमधील सीएटल थंडरबोल्ट संघाकडून खेळतो.

तर दिल्ली रणजी संघाकडून खेळलेला अष्टपैलू खेळाडू मनन शर्मानेही अवघ्या 30 वर्षाच्या वयात भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये दिल्लीचा माजी फलंदाज मिलिंद कुमारचं नावही आहे. तसेच रतातील चंदीगड शहरात जन्मलेला 32 वर्षीय जसकरणने अमेरिका संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना 9 सप्टेंबर, 2021 रोजी पापुआ न्यू गिनी (PNG) संघाविरुद्ध एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता.

हे ही वाचा

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती

(Cricket stadium in America named after indian americans named Durga Agarwal and Sushila Agarwal)

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report