AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

सध्या क्रिकेट जगतातील एक आक्रमक फलंदाज आणि टी-20 स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध कायरन पोलार्ड त्याच्या डॅशिंग अंदाजासाठीही प्रसिद्ध आहे. तो त्याच्या फलंदाजीसह गोलंदाजीने सामना बदलू शकतो.

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO
कायरन पोलार्ड
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 12:17 PM
Share

मुंबई : सध्या टी-20 क्रिकेटमधील धाकड फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) जगभरातील बहुतेक लीगमध्ये खेळत असतो. इंडियन प्रिमियर लीगच्या (IPL 2021) मुंबई इंडियन्स संघाचा उप कर्णधार असणारा पोलार्ड सध्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (Caribbean Premier league) खेळत आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करणारा पोलार्ड त्याच्या आक्रमक अंदाजासाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. शक्यतो पोलार्डचे तुफान फलंदाजीचे किंवा क्षेत्ररक्षणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या पोलार्डचा मैदानावर पंचाच्या निर्णयाचा निषेध करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सीपीएलमध्ये त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट लूसिया किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात पोलार्ड पंचाच्या एका निर्णयावर रागवून मैदानातच विरोध दर्शवू लागला. सीपीएलमध्ये पोलार्ड नाइट रायडर्संधून खेळतो. यावेळी त्यांची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी नाइट रायडर्सचे खेळाडू 19 वी ओव्हर खेळत होते. वहाब रियाज गोंलंदाजी करत असताना समोर फलंदाजीला टिम सेइफर्ट तर नॉन स्ट्रा्ईकवर पोलार्ड होता. त्याचवेळी रियाजने एक अत्यंत वाईड स्टम्पापासून दूर चेंडू फेकला. चेंडू मारण्याच्या नादात टीम अक्षरश: खाली पडला. पण तरी देखील पंचानी चेंडू वाई़ड घोषित केला नाही. दरम्यान यावेळी पंचाच्या वाईड न देण्याच्या निर्णयाने पोलार्ड रागवला आणि काही न बोलता नॉन स्ट्राईक फलंदाज उभा राहतो तिथून फार दूर जाऊन थांबला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

असा झाला सामना

सामन्यात पोलार्डच्या नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला. त्यांनी प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7  विकेटच्या बदल्यात 158 धावा केल्या. पोलार्डने 29 चेंडूत 41 धावा केल्या. यावेळी त्याने सहा चौकार आणि  एक षटकार खेचला.  किंग्सचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये सात विकेटच्या बदल्यात 131 धावाच करु शकला. ज्यामुळे नाईट रायडर्सचा संघ विजयी झाला.

हे ही वाचा

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

Happy Birthday : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाना पछाडलं, ‘हा’ ठरला भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज

(Cricketer Kieron pollard got angry and protested against umpire decision in cpl match)

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?