भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

लाहोरमध्ये जन्माला आलेला हा खेळाडू भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही संघातून खेळला आहे. केवळ सहा कसोटी सामनेच खेळला. पण या सामन्यांमध्ये तो काही महत्त्वाच्या खेळी खेळला.

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:42 AM

लाहोर : क्रिकेट जगतात असे काही खेळाडू आहेत, जे दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. पण आज अशा एका खेळाडूचा वाढदिवस आहे, जो दोन देशांकडून कसोटी क्रिकेट खेळला आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हीच खास गोष्ट असून बऱ्याच मोठ्या वयात कसोटी क्रिकेटमध्ये विकेट पटकावणारा एक खेळाडू म्हणूनही त्याला ओळखलं जातं. तर आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत, त्या खेळाडूचं नाव आहे आमिर इलाही (Amir Elahi). 1 सप्टेंबर म्हणजे आजच्याच 1908 मध्ये जन्माला आलेल्या आमिरने भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे.

तर आमिर हा भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानकडून खेळायला लागला. लाहोरमध्ये जन्माला आलेल्या आमिरने केवळ सहा कसोटी सामने खेळले. पण या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती हे विशेष. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 1952 मध्ये पाकिस्तानने त्यांचा पहिला कसोटी विजय मिळवला, त्या संघात आमिर इलाही होता. विशेष म्हणजे हा सामना पाकिस्तान भारताविरुद्धच खेळली होती आणि पाच वर्षांपूर्वी भारताकडून खेळणारा आमिर सामन्यात पाकिस्तानकडून खेळत होता.

भारताकडून डेब्यू

आमिर इलाहीने 1947 मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. गोलंदाज म्हणून सामन्यात उतरलेल्या आमिरला गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. लाला अमरनाथ कर्णधार असलेला भारतीय संघ डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या डावात 81 धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठकला. पण त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णीत राहिला. सामन्यात आमिरला गोलंदाजी मिळाली नसली तरी फलंदाजी मात्र त्यांनी दोनदा केली. पहिल्या डावाचृत 10 व्या क्रमांकावर येत 4 तर दुसऱ्या डावात विनू मंकडसोबत त्यांनी ओपनिंग केली. यावेळी 13 धावा बनवल्या.

1952 मध्ये पाकिस्तान संघात

भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होताच दोन्ही देश वेगळे झाले. त्यानंतर आमिर पाकिस्तानला गेले आणि त्यांच्याकडून क्रिकेट खेळू लागले. 1952 मध्ये भारत दौऱ्यात त्याला संघात निवडलं गेलं. या दौऱ्यात पहिला कसोटी सामना भारताने जिंकला पण दुसऱ्या सामन्याचत पाकिस्तानने त्यांचा पहिला कसोटी विजय मिळवला. या सामन्यात आमिर यांनी खास योगदान दिले नाही. पण मालिकेतील आणखी एका कसोटीमध्ये 47 धावांची खेळी केली. हाच त्यांचा सर्वोच्च स्कोर होता. सहा कसोटी सामन्यात 82 धावा आणि 7 विकेट घेणाऱ्या आमिर यांनी एका सामन्यात 134 धावा देत चार विकेट घेतल्या होत्या. याशिवाय 125 प्रथम श्रेणी सामन्यात 513 विकेट्स घेत 2 हजार 562 धावा आमिरने बनवल्या।

हे ही वाचा

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

Happy Birthday : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाना पछाडलं, ‘हा’ ठरला भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

(Former India and Pakistani Cricketer amir elahi birthday on this day know some interesting cricket facts)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.