AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : आयपीएलमधील कोट्याधीश, वयाच्या 32 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण

भारताकडून एक-दोन नाही तर पाच खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघात पदार्पण केलं. पण यातील एक खेळाडू 32 वर्षांचा असून मागील 39 वर्षांत संघात पदार्पण करणारा तो सर्वांत वयस्कर खेळाडू आहे.

IND vs SL : आयपीएलमधील कोट्याधीश, वयाच्या 32 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण
श्रीलंका संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत 5 खेळाडूंचे संघात पदार्पण
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:07 PM
Share

कोलंबो : भारतीय आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात 5 खेळाडूंनी डेब्यू केला. मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघात (Indian Cricket Team)  एकाच वेळी पाच खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. याआधी डिसेंबर 1980 मध्ये असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मेलबर्नच्या मैदानात किर्ती आझाद, दिलीप जोशी, रॉजर बिनी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांना संघात संधी देण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकाच वेळी संघात संधी देण्यात आलेल्यांमध्ये नितीश राणा, राहुल चहर, चेतन साकरिया, संजू सॅमसन यांच्यासह अष्टपैलू कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) याचाही समावेश आहे. दरम्यान या सर्वांमध्ये गौथम हा सर्वात वयस्कर असून त्याने वयाच्या 32 व्या वर्षी संघात पदार्पण केले आहे.

भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा गौथम मागील 39 वर्षांतील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. कृष्णप्पा गौतमने 32 वर्षे 276 दिवसांचा असताना भारताच्या  प्लेइंग इलेवनमध्ये जागा मिळवली आहे. याआधी राकेश शुक्ला यांनी 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चेन्नईमध्ये 34 वर्ष 226 दिवसांचे असताना संघात स्थान मिळवलं होतं. विशेष म्हणजे तोच त्यांचा शेवटंचा सामना देखील ठरला.

गौथमचे आतापर्यंतची कारकिर्द

32 वर्षीय गौथमने स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. 42 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 166 विकेट्ससह 1 हजार 45 रन्स केले आहेत. तर 47 लिस्ट ए सामन्यात 70 विकेट मिळवत 558 रन्स केले आहेत. याखेरीज 62 टी-20 सामन्यात 41 विकेट्सह 594 रन्स गौथमच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, किंग्स 11 पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून गौथम खेळला आहे.

हे ही वाचा :

PHOTO : IPL गाजवल्यानंतर एकदिवसीय संघात पदार्पण, एकाच वेळी पाच नव्या चेहऱ्यांची भारतीय संघात एन्ट्री

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती

(CSK Player krishnappa Gowtham debuts for indian Cricket team in age of 32)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली