IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती

भारताने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे एकाच वेळी संघातून 5 खेळाडूंनी पदार्पण केले आहे.

IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती
भारतीय संघातून पदार्पण केलेले पाच खेळाडू
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 7:56 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) जागतिक क्रिकेटला एकापेक्षा एक धुरंदर क्रिकेटपटू दिले. जगातील सर्वोत्कृष्ठ फलंदाज म्हणून नावाजल्या जाणारा ज्याला अगदी क्रिकेटचा देव म्हटलं जात तो सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) भारताताच. सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये तगडी टीम असणाऱ्या भारतीय संघात आज एकदिवसीय टीममध्ये 5 नव्या चेहऱ्यांनी पदार्पण केलं आहे. यातील तिघांनी तर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आहे. विशेष म्हणजे 40 वर्षानंतर असे काही भारतीय क्रिकेटमध्ये घडले आहे. यापूर्वी डिसेंबर, 1980 मध्ये अशाचप्रकारे 5 नवोदीतांनी भारतीय संघात एकाचवेळी पदार्पण केलं होतं.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात (India vs Sri lanka ODI) नाणेफेक होण्यापूर्वीच भारतीय संघाने हे  बदल केले होते. याचे कारण तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे नवे प्रयोग करण्यासाठी भारताने या 5 नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि राहुल चहर या टी-20 मध्ये भारतीय संघातून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तर कृष्णप्पा गौथम,  नितेश राणा आणि चेतन सकारिया या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.

40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

भारती क्रिकेट संघात आज (23 जुलै) ज्याप्रमाणे 5 खेळाडूंनी डेब्यू केला. त्याच प्रमाणे याआधी 40 वर्षांपूर्वी भारतीय संघाच्या 1980-81 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच खेळाडूंनी संघात पदार्पण केलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मेलबर्नच्या मैदानात किर्ती आझाद, दिलीप जोशी, रॉजर बिनी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांना संघात संधी देण्यात आली होती.

हे ही वाचा :

VIDEO : गोलंदाजी करताना कृणालचा श्रीलंकन फलंदाजाला लागला धक्का, मग केले असे काही की जिंकली सर्वांचीच मने, पाहा व्हिडीओ

IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(In team India 5 players debuted against sri lanka in third odi history repeated after 40 years)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.