IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा

दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी 8 व्या विकेटसाठी 84 धावांची नाबाद भागिदारी केली. ज्याच्याच जोरावर भारताने श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये 3 विकेट्सनी अप्रतिम विजय मिळवला.

IND vs SL : 'या' कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा
राहुल द्रविडने दीपकला सातव्या फलंदाजाच्या रुपात फलंदाजीसाठी पाठवले,
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:16 PM

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी (20 जुलै) झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट टीमने (Indian Cricket Team) शेवटपर्यंत लढा देत विजयश्री मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे भारताचा युवा खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar). आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दीपकने बॅटची जादू दाखवत 82 चेंडूत 69 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान चहरसोहबत मैदानात असणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) या विजयाचं श्रेय कोच राहुल द्रविडला देत कसा राहुलचा एक निर्णय विजयासाठी महत्त्वाचा ठरला हे सांगितल.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारले सांगितलं, “आधी आमचं लक्ष्य शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करायचं हे होतं. आम्ही याच प्लानने फलंदाजी करत असताना दीपकने अप्रतिम फलंदाजी करत थेट विजयच मिळवून दिला.” दरम्यान यावेळी बोलताना भुवनेश्वरने कोच राहुल द्रविड याने दीपकला प्रमोट करत 7 व्या स्थानावप फलंदाजीला पाठवण्याचं कारणही सांगितलं.

म्हणून द्रविडने केल चहरला प्रमोट

भुवनेश्वर म्हणाला “दीपक कोच राहुल द्रविडच्या शिकवणीखाली अनेक सामने खेळला आहे. भारताच्या ‘ए’ संघातही  अनेक सिरीजमध्ये दीपक राहुलच्या प्रशिक्षणाखाली खेळला आहे. तिथे त्याने बरेच रन देखील केले आहेत. त्यामुळे द्रविडला दीपक धावा करु शकतो हे चांगल्याप्रकारे माहित होते. त्यामुळे त्याने दीपकला सातव्या स्थानावर फलंदाजीला पाठवले.”

राहुलने सामन्यांदरम्यान चहरला दिला महत्त्वाचा संदेश

श्रीलंकेने भारतीय संघाला विजयासाठी 276 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ढेपाळला. पहिल्या फळीतील आणि मधल्या फळीतील खेळाडू लवकर तंबूत परतले. अपवाद सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. पांड्याने 35 धावा केल्या. मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी मॅचमध्ये पुनरागमन करत एक एक विकेट्स घेत भारताची अवस्था 193 धावांवर सात बाद, अशी केली. अशा वेळी मैदानात चहर-भुवीची जोडी होती. या जोडीने संयम शब्दाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिलं. ही जोडी विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत होती. या साऱ्यात राहुल द्रविडने नेमक्या क्षणी चहरसाठी एक मेसेज पाठवला.  “तुला शेवटपर्यंत खेळायचंय. सगळे बॉल खेळून काढ…”, असा मेसेज राहुल द्रविडने चहरसाठी पाठवला. साहजिक द्रविडचा तो मेसेज चहरने सामन्याच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवला. कोणतीही घाई गडबड न करता चहर खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभा राहिला. परिणामी भारताने अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली.

हे ही वाचा :

IND vs SL : श्रीलंकेला नमवत टीम इंडियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

दीपक चहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

(Bhuvneshwar kumar tells why coach rahul dravid promotes Deepak on sevent position in India vs sri lanka 2nd odi)

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.