DC vs GT : कॅप्टनचं जोरदार कमबॅक, दमदार अर्धशतक, शुबमनने 1 वर्षानंतर असं केलं

Shubman Gill vs Delhi Capitals IPL 2026: शुबमन गिल याची पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यातील अर्धशतक करण्याची संधी हुकली होती. शुबमनने अर्धशतकाची प्रतिक्षा दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या सामन्यात संपवली. शुबमनने यासह खास कामगिरी केली आहे.

DC vs GT : कॅप्टनचं जोरदार कमबॅक, दमदार अर्धशतक, शुबमनने 1 वर्षानंतर असं केलं
Shubman Gill Fifty IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 08, 2026 | 11:09 PM

गुजरात टायटन्स टीमची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत अतिशय निराशाजनक अशी कामगिरी राहिली आहे. गुजरातला त्यामुळेच सलग 2 सामने गमवावे लागले.  पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सने गुजरातला पराभवाची धुळ चारली. गुजरातचा नियमित कर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमळे राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलेलं. गुजरातला राजस्थान विरूद्धच्या सामन्यात शुबमनची उणीव भासली. राजस्थानने गुजरातवर अवघ्या 6 धावांनी मात केली होती. त्यामुळे शुबमन त्या सामन्यात असता तर निकाल वेगळा असता, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता शुबमनने दिल्ली विरुद्ध जोरदार कमबॅक केलं आहे.

शुबमनने अरुण जेटली स्टेडियममध्ये दुखापतीतून परतल्यानंतर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध अर्धशतक ठोकलं. शुबमनने दिल्ली विरुद्ध 45 चेंडूत 70 धावांची अप्रतिम खेळी केली. शुबमनने या 70 पैकी 46 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने मिळवल्या. शुबमनने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले.

शुबमनने दिल्ली विरुद्ध आक्रमक सुरुवात केली. शुबमनने पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली. शुबमनने फक्त 33 चेंडूत अर्धशतक झळकावलं. शुबमनने यासह 1 वर्षाची प्रतिक्षा संपवली.

20 व्या डावात पहिलं अर्धशतक

शुबमनचं 20 व्या डावातील हे पहिलं टी 20 अर्धशतक ठरलं. शुबमनने याआधी अखेरचं अर्धशतक हे आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच लगावलं होतं. शुबमनने तेव्हा अरुण जेटली स्टेडयममध्ये नाबाद 93 धावा केल्या होत्या.

शुबमनला 19 व्या मोसमात गुजरातच्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध चांगली सुरुवात मिळाली होती. शुबमनला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन अर्धशतकापासून 11 धावांनी दूर राहिला. शुबमनने पंजाब विरुद्ध 27 चेंडूत 39 रन्स केल्या होत्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

गुजरातची डबल सेंच्युरी

शुबमनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 200 पार मजल मारली. गुजरातने 120 बॉलमध्ये 4 विकेट्स गमावून 210 रन्स केल्या. गुजरातला 210 धावांपर्यंत पोहचवण्यात शुबमन व्यतिरिक्त जोस बटलर आणि ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही योगदान दिलं. जोसने 52 आणि सुंदरने 55 धावा केल्या. सुंदरचं हे आयपीएल कारकीर्दीतील पहिलंविहलं अर्धशतक ठरलं.

दरम्यान शुबमन, बटलर आणि सुंदर व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स आणि साई सुदर्शन या दोघांनीही योगदान दिलं.साईने 12 धावा जोडल्या. तर ग्लेनने नाबाद 14 धावांचं योगदान दिलं. तर दिल्लीसाठी मुकेश कुमार याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us