DC vs MI Live Streaming : मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

Delhi Capitals vs Mumbai Indians IPL 2026 Live Scorecard : दिल्ली कॅपिट्ल्स 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. दिल्ली होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियममध्ये विजयी सलामी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

DC vs MI Live Streaming : मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
Jasprit Bumrah Mumbai Indians vs Delhi Capitals
Image Credit source: Bcci/IPL
| Updated on: Apr 03, 2026 | 11:31 PM

आयपीएलच्या 19 व्या पर्वात शनिवारी 4 एप्रिल रोजी पहिल्या डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर ऑलराउंडर अक्षर पटेल दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या पर्वातील दुसरा सामना असणार आहे. दिल्ली आणि मुंबईने या पर्वात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ सलग दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने दिल्ली-मुंबई सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शनिवारी 4 एप्रिलला होणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस होईल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

दिल्ली वरचढ की मुंबई सरस?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात शनिवारी 4 एप्रिलला होणारा 38 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात झालेल्या 37 पैकी सर्वाधिक सामन्यांत मुंबई इंडियन्स वरचढ असल्याचा इतिहास आहे. मुंबईने 37 पैकी 21 सामन्यांमध्ये दिल्लीचा धुव्वा उडवला आहे. तर दिल्लीने 16 सामन्यांत पलटवार करत पलटणला पराभवाची धुळ चारली आहे. आता शनिवारी मुंबई 22 वा सामना जिंकणार की दिल्ली 17 व्यांदा पलटणला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us