Dinesh Karthik : ‘मी आता जे काही सांगणार आहे, ते…’ दिनेश कार्तिकच विराटच्या नंबर 3 स्थानाबद्दल महत्त्वाचं विधान

| Updated on: Feb 03, 2023 | 12:24 PM

Dinesh Karthik : कारण त्याची जागा घेणारी नावं मोठी असतील आणि मग तेव्हा आपण मागे जाऊन स्कोअर पाहून म्हणू की, त्याने फक्त 40 किंवा 30 धावा केल्या होत्या. सीनियर खेळाडूच्या अनुपस्थितीत युवा टीम इंडियाने चांगला खेळ दाखवला.

Dinesh Karthik : मी आता जे काही सांगणार आहे, ते... दिनेश कार्तिकच विराटच्या नंबर 3 स्थानाबद्दल महत्त्वाचं विधान
Dinesh karthik-Virat Kohli
Follow us on

नवी दिल्ली : श्रीलंकेपाठोपाठ न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीजमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांशिवाय टीम इंडिया ही सीरीज खेळली. रोहित आणि विराटच वाढतं वय लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी टीम इंडियाच्या T20 संघाचे दरवाजे बंद झालेत. सीनियर खेळाडूच्या अनुपस्थितीत युवा टीम इंडियाने चांगला खेळ दाखवला. रांचीच्या पहिल्या टी 20 सामन्यात 21 धावांनी पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात लखनौमध्ये अवघ्या 100 धावांचा पाठलाग करताना रडतखडत विजय मिळवला. तेच तिसऱ्या सामन्यात मात्र 168 धावांनी दिमाखदार विजय मिळवला.

त्रिपाठीने चांगला सपोर्ट् केला

शुभमन गिलने या सीरीजमध्ये आपण टी 20 फॉर्मेटमध्येही फिट असल्याच दाखवून दिलं. कारण न्यूझीलंड विरुद्ध सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला होता. तिसऱ्या सामन्यात त्याने 63 चेंडूत 126 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 7 सिक्स होते. 20 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 234/4 धावांचा डोंगर उभारला. गिलला यावेळी मैदानात राहुल त्रिपाठीने चांगला सपोर्ट् केला. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यामुळे राहुलच्या सुद्धा टीममधील स्थानाला धोका निर्माण झाला होता.

दिनेश कार्तिक खूपच प्रभावित

ओपनर इशान किशन आऊट झाल्यानंतर राहुल त्रिपाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी क्रीजवर आला. त्याने 22 चेंडूत 44 धावा चोपल्या. त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. चार फोर आणि तीन सिक्स त्याने मारले. राहुल त्रिपाठीची बॅटिंग पाहून दिनेश कार्तिक खूपच प्रभावित झालाय. त्याने चाहत्यांसाठी एक संदेश दिलाय.

दिनेश कार्तिक काय म्हणाला?

“मी आता जे काही सांगणार आहे, ते फक्त राहुल त्रिपाठीसाठी आहे, असं मला वाटत नाही. हे त्या सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आहे, जे भारतीय क्रिकेटला खूप जवळून फॉलो करतात. कृपया येत्या काळात हे विसरू नका कारण त्याची जागा घेणारी नावं मोठी असतील आणि मग तेव्हा आपण मागे जाऊन स्कोअर पाहून म्हणू की, त्याने फक्त 40 किंवा 30 धावा केल्या होत्या.

निस्वार्थीपणे तो खळतो

“तो ज्या परिस्थितीत बॅटिंगला जातो, ती स्थिती आपण समजून घेतली पाहिजे. करिअरची आता सुरुवात झालीय. स्थान धोक्यात येऊ शकतं, हे कळूनही निस्वार्थीपणे तो खळतो. आक्रमक बॅटिंग करतो. मोठे शॉट्स मारतो. धोका पत्करतो. कारण मस्ट-वीन मॅचेसमध्ये टीमची ती गरज असते” असं कार्तिक म्हणाला. दिनेश कार्तिक क्रीकबजशी बोलला.

तो नंबर 3 च्या पोजिशनवर खेळला पाहिजे

“आपण त्याला 3 किंवा 6 महिन्यात विसरु नये. त्याच्यासाठी आयपीएलचा सीजना चांगला असेल किंवा नसेल. पण टीम इंडियात त्याला नंबर 3 च स्थान मिळालं पाहिजे. विराट कोहली खेळत असेल, तर मग प्रश्न नाही. पण विराट नसताना, तो नंबर 3 च्या पोजिशनवर त्याला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे” असं दिनेश कार्तिक राहुल त्रिपाठीबद्दल म्हणाला.

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 35 धावा फटकावल्या होत्या. त्यावेळी सुद्धा त्याने अशीच आक्रमक बॅटिंग केली होती.