Live सामन्यात बॅट टेस्ट फेल, मग खेळाडूने मैदानात केलं असं काही; पंचही झाले आवाक् Video

DPL 2026: दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात घडलेल्या एका प्रकारामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बॅट गेज टेस्ट केल्यानंतर फलंदाजाची बॅट फेल गेली. त्यानंतर सेंट्रल दिल्लीचा फलंदाज जोंटी सिद्धूने देशी जुगाड केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Live सामन्यात बॅट टेस्ट फेल, मग खेळाडूने मैदानात केलं असं काही; पंचही झाले आवाक् Video
Live सामन्यात बॅट टेस्ट फेल, मग खेळाडूने मैदानात केलं असं काही; पंचही झाले आवाक् Video
Image Credit source: DPL
| Updated on: Aug 04, 2026 | 5:07 PM

Jonty Sidhu, Delhi Premier League 2026: दिल्ली प्रीमियर लीग 2026 स्पर्धा सुरू असून सातव्या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्स आणि नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्सने 4 गडी राखून नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सला पराभूत केलं. नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमवून 209 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी सेंट्रल दिल्ली किंग्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पावरप्लेच्या सहा षटकात 2 गडी गमवून 48 धावा केल्या. त्यामुळे सेंट्रल दिल्ली संघ अडचणीत आला होता. त्यानंतर युगल सैनी आणि वंश बेदी स्वस्तात बाद झाले. त्यामुळे 9.5 षटकात 86 धावा अशी स्थिती होती. त्यानंतर जोंटी सिद्धू आमि आदित्य भंडारीचं वादळ घोंघावलं आणि नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिद्धार्थ जूनची विकेट पडली आणि जोंटी सिद्धू फलंदाजीला आला. फलंदाजीला आल्या आल्या त्याच्या बॅटची तपासणी केली गेली. तपासणी करण्यासाठी बॅट गेजचा वापर केला गेला. हे गेज बॅटमधून सहज जाते की नाही हे तपासलं जातं. जर हे उपकरण बॅटमध्ये कुठे अडकलं तर बॅट बदलावी लागते. त्यामुळे फलंदाजाला काही काळ तणाव सहन करावा लागतो. असंच काहिसं जोंटीच्या बॅटबाबत झालं आणि गेच बॅटमध्ये अडकलं. त्यामुळे जोंटीला नियमानुसार बॅट बदलणं गरजेचं होतं. पण त्याने यावेळी आपल्या डोकं लावलं आणि गेज बॅटमधून जाण्यासाठी देशी जुगाड लावला.

जोंटीने दुसऱ्या बॅटसाठी इशारा केला आणि त्याचं डोकं चाललं. त्याने लगेच नॉन स्ट्राईकर एन्डला असलेल्या युगल सैनी बॅट घेतली. त्या बॅटने त्याने आपल्या वरून ठोकलं. हातोडीसारखा दुसऱ्या बॅटचा वापर केला. त्यामुळे लाकूड थोडं दाबलं गेलं. त्यानंतर त्याने लगेच पंचांकडे गेज मागितलं आणि बॅट तपासण्यास सांगितलं. तेव्हा ते गेज बॅटमधून सहज गेलं. त्यामुळे त्याला बॅट बदलावी लागली नाही. जोंटीचा हा जुगाड पाहून मैदानातून खेळाडू आणि पंचही आवाक् झाले.

जोंटी सिद्धूने त्यानंतर नॉर्थ दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 38 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. यावेळी त्याने 197.37 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे सेंट्रल दिल्ली किंग्सचा विजय सोपा झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us