AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AFG, U19 World Cup: अफगाणिस्तानच स्वप्न मोडलं, इंग्लंड 24 वर्षानंतर खेळणार वर्ल्डकप फायनल

अफगाणिस्तानचं स्वप्न अखेर मोडलं आहे. आपल्या देशातल्या कठीण परिस्थितीवर मात करुन अफगाणिस्तानचा संघ इथपर्यंत पोहोचला होता.

ENG vs AFG, U19 World Cup: अफगाणिस्तानच स्वप्न मोडलं, इंग्लंड 24 वर्षानंतर खेळणार वर्ल्डकप फायनल
(फोटो- Cricket World Cup)
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 8:27 AM
Share

अँटिग्वा: U19 World Cup: अंडर 19 वर्ल्डकप जिंकण्याचं (U19 World Cup 2022) अफगाणिस्तानचं स्वप्न अखेर मोडलं आहे. आपल्या देशातल्या कठीण परिस्थितीवर मात करुन अफगाणिस्तानचा संघ इथपर्यंत पोहोचला होता. काल झालेल्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने (England) डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे अफगाणिस्तानचा (Afghanistan) 15 धावांनी पराभव केला. इंग्लंड अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. 1998 नंतर पहिल्यांदा इंग्लंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. मागच्या 10 वर्ल्डकप स्पर्धांमध्ये इंग्लंडचा संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. ती अपयशाची मालिका काल इंगलंडच्या अंडर 19 टीमने खंडीत केली. इंग्लंडने याआधी वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली, त्यावेळी त्यांनी न्यूझीलंडला नमवलं होतं. अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील विजेत्याशी होणार आहे. आज सेमीफायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.

अफगाणिस्तानचा युवा संघ पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्डकपच्या उपांत्यफेरी पर्यंत पोहोचला होता. त्यांना अनुभवाच्या कमतरतेचा फटका बसला. अफगाणिस्तानने इंग्लंडच्या सहा फलंदाजांना 131 धावांवरच तंबूत पाठवलं होतं. पण त्यानंतरही इंग्लंडचा संघ 231 धावांपर्यंत पोहोचला.

इंग्लंडचे दोन फलंदाज अफगाणिस्तानला भारी पडले प्रथम फलंदाजी करायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडकडून सलामीवीर जॉर्ज थॉमसने टॉप ऑर्डरमध्ये खेळताना शानदार अर्धशतक झळकावलं. त्याच्याशिवाय टॉप ऑर्डरमधला दुसरा कुठला अन्य फलंदाज 20 धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. मधल्याफळीतील जॉर्ज बेलने 67 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ 47 षटकात 231 धावांपर्यंत पोहोचला.

अफगाणिस्तानने इंग्लंडच्या सहा विकेट काढल्या. त्यात डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदने दोन विकेट काढल्या. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनसाठीही या नूर अहमदची निवड झाली आहे.

अनुभवाच्या कमतरतेचा फटका इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची पहिली विकेट डावाच्या सुरुवातीलाच गेली. त्यानंतर इंग्लंडचा संघ थोडा टेन्शनमध्ये आला होता. दुसऱ्या विकेटसाठी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी केली. 24 षटकात त्यांच्या 100 धावा झाल्या होत्या. पण त्यानंतर 12 धावात त्यांनी तीन विकेट गमावल्या. पाचव्या विकेटसाठी पुन्हा अर्धशतकीय भागीदारी झाली.

अफगाणिस्तानचा संघ चांगल्या स्थितीत वाटत होता. पण दबावाखाली त्यांची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. इंग्लंडच्या संघाने सामन्यात पुनरागमन केलं. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. त्यांची शेवटची जोडी मैदानात होती. त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता. अखेर संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळणाऱ्या अफगाणिस्तानची घोडदौड सेमीफायनलमध्ये थांबली.

eng vs afg england beat afghanistans and book place in u 19 world cup final

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.