
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. सध्या या स्पर्धेत सुपर 8 फेरीचा थरार पाहयाला मिळतोय. इंग्लंडने सुपर 8 फेरीत सलग 2 सामने जिंकून सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यानंतर टीम इंडियाने गुरुवारी 26 फेब्रुवारीला झिंबाब्वेवर 72 धावांनी मात करत सुपर 8 फेरीतील पहिला विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. तर भारताच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिका ए ग्रुपमधील सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली तर एकूण दुसरी टीम ठरली आहे. आता शुक्रवारी सुपर 8 फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत.
इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र इंग्लंडचा हा सामना जिंकून सुपर 8 फेरीत नंबर 1 राहण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. अशात न्यूझीलंड या सामन्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 फेरीतील सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना शुक्रवारी 27 फेब्रुवारीला होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सुपर 8 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.