AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK : कॅप्टन ब्रूकचं शतक, इंग्लंड सेमी फायनलमध्ये, पाकिस्तानचा पत्ता कट!

England vs Pakistan Super 8 Match Result : इंग्लंड क्रिकेट टीमने श्रीलंकेनंतर पाकिस्तानवर मात करत सुपर फेरीत सलग दुसरा सामना जिंकला आणि सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

ENG vs PAK : कॅप्टन ब्रूकचं शतक, इंग्लंड सेमी फायनलमध्ये, पाकिस्तानचा पत्ता कट!
Harry Brook England vs PakistanImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 25, 2026 | 5:56 AM
Share

कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या चाबूक शतकाच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेतील पल्ल्केले स्टेडियममध्ये पाकिस्तानने ओपनर साहीबझादा फरहान याच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली आहे. इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिलीच टीम ठरली आहे. तर पाकिस्तानचं या पराभवासह आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

सामन्यात काय झालं?

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र ओपनर साहिबजादा फरहान याचा अपवाद वगळता इतर एकलाही 25 पार मजल मारता आली नाही. साहिबजादा फरहान याने 45 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 63 रन्स केल्या. बाबर आझम आणि फखर झमान या दोघांनी प्रत्येकी 25 धावांचं योगदान दिलं. तर शादाब खान याने 23 धावा जोडल्या. इंग्लंडसाठी लियाम डॉसन याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन या दोघांनी पाकिस्तानच्या प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आदिल रशीद याने 1 विकेट मिळवली.

पाकिस्तानची कडक सुरुवात

पाकिस्तानच्या शाहिन शाह अफ्रिदी याने विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला पहिल्याच बॉलवर झटका दिला. शाहिनने फिलिप सॉल्ट याला आऊट केलं. त्यानंतर शाहिनने विकेटकीपर जोस बटलर याला 2 धावांवर बाद करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जेकब बेथल याने 8 तर टॉम बँटन याने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 4 आऊट 58 अशी झाली. पाकिस्तानने अशाप्रकारे सामन्यावर घट्ट पकड मिळवली. मात्र कॅप्टन हॅरी ब्रूक याने कमाल केली. हॅरी ब्रूक याने सॅम करन याच्यासह 45 तर विल जॅक्स याच्यासह 52 धावांची भागीदारी केली. सॅमने 16 धावा केल्या. हॅरीने सॅम आणि विल यांच्यासह केलेल्या या भागीदारीमुळे इंग्लंडने कमबॅक केलं आणि पाकिस्तानला बॅकफुटवर टाकलं.

हॅरीचं ऐतिहासिक शतक

हॅरीने अवघ्या 50 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. मात्र हॅरीने शतकानंतर दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. हॅरीच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. हॅरी आऊट झाल्यानंतर इंग्लंडला 18 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने झटपट 2 झटके दिले. विलने 28 धावा केल्या. तर जेमी ओव्हरटन झिरोवर आऊट झाला. त्यामुळे सामन्यात ट्विस्ट आला. मात्र लियाम डॉसन आणि जोफ्रा आर्चर या दोघांनी नाबाद राहून इंग्लंडला विजयी केलं. लियामने 1 तर जोफ्राने 5 धावा केल्या. पाकिस्तानसाठी शाहिन आफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद नवाझ आणि उस्मान तारीक या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?