टीम इंडियाच्या वातावरणावर विराट कोहली नाराज? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा; ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडलं?

Virat Kohli News: विराट कोहलींबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. टीम इंडियाच्या वातावरणामुळे तो निराश असल्याचा दावा माजी क्रिकेटपटूने केला आहे.

टीम इंडियाच्या वातावरणावर विराट कोहली नाराज? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा; ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 30, 2026 | 8:30 PM

विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यात व्यस्त असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्याबद्दल एक मोठा दावा केला आहे. संघातील वातावरणाला नाखूश असल्यामुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेट इतक्या लवकर सोडले. एकदिवसीय सामन्यांमधील कोहलीची फलंदाजीची कामगिरी पाहता एकदिवसीय विश्वचषकानंतरही कोहलीला निवृत्तीपासून रोखले जाईल, असे दिसते. जे भारतीय संघ आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या हिताचे असेल, असे मोहम्मद कैफ म्हणाला आहे.

मोहम्मद कैफ यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, जेव्हा जेव्हा मी विराट कोहलीच्या मुलाखती पाहतो, तेव्हा मला त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसते. त्याचा फॉर्म खराब असला तरी तुम्ही विराट कोहलीबद्दल बोलत आहात. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही वाईट दिवस पाहिले आहेत. त्याच्या मुलाखतींवरून हे दिसून येते की तो संघातील वातावरणाने खूश नव्हता. असे वाटते की विराट कोहलीला महत्त्व दिले जात नव्हते आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जात नव्हता.

Loading...

मोहम्मद कैफ विराट कोहलीबद्दल पुढे म्हणाला की, माझा विश्वास आहे की जर त्याने कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवले असते, तर त्याने नक्कीच पुनरागमन केले असते. तो पुनरागमनासाठी ओळखला जातो. तो विश्वचषकापर्यंत खेळेल. ज्याप्रकारे विराट खेळत आहे, ते पाहता असे वाटते की तो १०० शतकांच्या जवळ पोहोचेल.

पण एकदा विश्वचषक संपल्यावर जो कोणी त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेईल, तो त्याचा दमदार फॉर्म पाहून त्याला संघात कायम ठेवावे असे म्हणेल. तसेही होऊ शकते. तो तंदुरुस्त आहे आणि धावा करत आहे. त्याच्या संघात असण्याने कर्णधार गिलला मदत होईल. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत गिलला अडचणींचा सामना करावा लागतो. कोहली संघात जितका जास्त काळ राहील, तितके ते गिलसाठी चांगले होईल, असं मत कैफने व्यक्त केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us