AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly: हार्दिक पंड्याला थेट टीम इंडियात एंट्री नाही? सौरव गांगुलीने दिले महत्त्वाचे संकेत

भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करणार की, नाही हा मोठा प्रश्न आहे. मागच्या बऱ्याचाकाळापासून तो गोलंदाजी करताना दिसलेला नाही.

Sourav Ganguly: हार्दिक पंड्याला थेट टीम इंडियात एंट्री नाही? सौरव गांगुलीने दिले महत्त्वाचे संकेत
Hardik Pandya
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 5:45 PM
Share

मुंबई: भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करणार की, नाही हा मोठा प्रश्न आहे. मागच्या बऱ्याचाकाळापासून तो गोलंदाजी करताना दिसलेला नाही. त्यामुळेच भारतीय संघातील त्याचे स्थान धोक्यात आले आहे. हार्दिक पंड्या शेवटचं नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय संघातून खेळला होता. भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी सुद्धा त्याची निवड झालेली नाही. आयपीएल 2022 पासून तो क्रिकेट पुन्हा सुरु करेल, असं दिसतय. या पार्श्वभूमीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हार्दिक पंड्याच्या खेळण्याच्या शक्यतेबद्दल माहिती दिलीय. हार्दिकला पूर्णपणे फिट होण्यासाठी आराम दिला होता. हार्दिक पंड्या तुम्हाला रणजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, असे सुद्धा सौरव गांगुलीने संकेत दिले आहेत.

हार्दिक पंड्या 2019 वर्ल्डकप स्पर्धेपासून पूर्णपणे फिट नाहीय. त्याच्या पाठिवर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्याने गोलंदाजी केलेली नाही. आयपीएल 2021 मध्ये हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. त्यानंतर टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत तो गोलंदाजी करेल, असे सांगण्यात आले. पण त्याने काही षटकच गोलंदाजी केली. त्यानंतर तो संघाबाहेर गेला. भारतीय संघात काही वेळासाठी आपली निवड करु नये, असं हार्दिकही स्वत: म्हणाला होता.

हार्दिकच्या फिटनेसवर सौरव म्हणाला… “हार्दिक दुखापतग्रस्त होता. त्यामुळे पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला आराम दिला. दीर्घकाळ त्याला भारतासाठी क्रिकेट खेळता यावं, म्हणून असं केलं. मला तो रणजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. तो जास्त ओव्हर गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे” सौरवने पीटीआयला दिलेल्या मुलाखीतत हे सांगितलं

IPL 2022 मध्ये हार्दिक कॅप्टन हार्दिक आयपीएल 2022 स्पर्धेत अहमदाबाद संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. “हार्दिक आता अहमदाबादचा कॅप्टन आहे. या प्लॅटफॉर्मवर निवड समितीचे सदस्य त्याचा खेळ आणि फिटनेस पाहतील. त्यानुसार पुढील निर्णय घेतील” असं सौरव गांगुली म्हणाला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली