AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने 10 किलो वजन कसं कमी केलं? याबाबत लाईव्ह सामन्यात खुलासा; 252 तास केलं असं!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा स्लीम अँड फिट दिसत आहे. अचानक रोहित शर्मात झालेला बदल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने 10 किलो वजन कमी केल्याचं बोललं जात आहे. पण त्याने हे वजन कमी कसं केलं त्याबाबतचा खुलासा लाईव्ह सामन्यादरम्यान करण्यात आला.

रोहित शर्माने 10 किलो वजन कसं कमी केलं? याबाबत लाईव्ह सामन्यात खुलासा; 252 तास केलं असं!
रोहित शर्माने 10 किलो वजन कसं कमी केलं? याबाबत लाईव्ह सामन्यात खुलासा; 252 तास केलं असं!Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 5:27 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर म्हणजेच 7 महिन्यानंतर रोहित शर्मा मैदानात उतरला. यावेळी त्याची शरीरयष्टी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रोहित शर्मा बारीक झाल्याचं पाहायला मिळालं. पोटही आत गेलं होतं. इतका बदल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने फिटनेस ठेवत असल्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी 10 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी त्याने 252 तास मेहनत घेतली होती. त्याचा परिणाम आता दिसून आला आहे. आता प्रश्न असा आहे की रोहित शर्माने वजन कमी कसं केलं? 252 तास त्याने नेमकं काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तर रोहित शर्माला ट्रेन करण्यात योगदान असलेल्या व्यक्तीने दिले आहेत. रोहित शर्माचा जवळचा मित्र आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक नायर आहे आणि त्यानेच या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

अभिषेक नायरने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीत सांगितलं की, रोहित शर्माने एक दोन नाही तर 10 किलो वजन कमी केले आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी रोहित शर्माने अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सरावही केला. अभिषेक शर्माने सांगितलं की, रोहित शर्माने तीन महिन्यात 10 किलो वजन कमी केले. रोहित शर्माने 12 आठवड्यांच्या प्रशिक्षणापैकी आठ आठवडे कठोर प्रशिक्षणासाठी घालवले. तर चार आठवडे त्याने फलंदाजीचं कौशल्य आणि इतर पैलूंच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं. पहिल्या आठ आठवड्यांपैकी पहिले पाच आठवडे हे बॉडी बिल्डिंग माइंडसेवर घालवले. यात त्याने फक्त शरीरावर काम केलं.

रोहित शर्माने तीन महिन्यांच्या कालावधीत रोज 3 तास घाम गाळला. यात त्याने खूप मेहनत केली. म्हणजेच रोज तीन तास म्हणजेच आठवड्याला 21 तास काम केलं. हे गणित 12 आठवड्यांचा जोडलं तर त्याने 252 तास पूर्ण मेहनत घेतली. रोहित शर्मा आता फिट तर दिसत आहे. पण त्याला फलंदाजीतही सातत्यपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्याच सामन्यात अवघ्या 8 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्याकडून आता दुसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?