ICC T20I Rankings: केएल राहुल भारताचा नंबर 1 फलंदाज, कोहली टॉप-10 मधून बाहेर, रोहितची मोठी उडी

| Updated on: Nov 24, 2021 | 4:08 PM

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलला टी-20 विश्वचषक 2021 आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. ICC च्या ताज्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत राहुलने प्रगती केली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलला टी-20 विश्वचषक 2021 आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. ICC च्या ताज्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत राहुलने प्रगती केली आहे. क्रमवारीत त्याने एका स्थानाची झेप घेतली आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा माजी टी-20 कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळानंतर टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे.

2 / 5
विश्वचषकात अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावल्यानंतर राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही 65 धावा फटकावल्या. राहुलने त्याच्या शेवटच्या 5 डावात 4 अर्धशतके झळकावली आहेत, त्याचा त्याला फायदा झाला. ताज्या क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

3 / 5
ICC T20I Rankings: केएल राहुल भारताचा नंबर 1 फलंदाज, कोहली टॉप-10 मधून बाहेर, रोहितची मोठी उडी

4 / 5
दुसरीकडे या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्मालाही उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला असून दोन स्थानांनी झेप घेत तो 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने विश्वचषकातील शेवटच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह 159 धावा केल्या होत्या.

5 / 5
इतर खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल पुन्हा एकदा टॉप 10 मध्ये परतला आहे. गप्टिलने भारताविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती. तो आता दहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवाननेही एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर उडी मारली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम तिसऱ्या स्थानावर आहे.