अन् दोन सेकंदात गेम फिरला, वेस्ट इंडिजने ही चूक केली अन् श्रेयस अय्यरने बॉलरची पिसे काढली; Video पाहाच!
भारताची फलंदाजी सुरुवातीलाच गडबडली, पण संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी डाव सावरला. यादरम्यान न्यूझीलंडकडून एक महत्त्वाची संधी हुकली. श्रेयस अय्यरला मिळालेल्या जीवदानानंतर सामन्यात नेमकं काय घडलं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा आज पहिला सामना होता. या सामन्यात भारतानेच बाजी मारली आहे. भारताने बाजी मारली असली तरीही या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु झाली तेव्हा भारताचा डाव गडबडला होता. भारताला सुरुवातीलाच मोठे हादरे बसले होते.
भारताचा स्टार फलंदाज अभिषेत शर्मा हा 29 धावांवर बाद झालेला, त्यानंतर तिलक वर्मा तर केवळ 6 धावांवर बाद झाला. इशान किशनही केवळ १ धाव करुन बाद झाल्याने भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं. पण संजू सॅमसन आणि कर्णधार श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांच्या दमदार खेळीमुळे भारताला हा विजय शक्य झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूझीलंडने दिलेला 225 धावांसारखा मोठा रनचेज भारताने पूर्ण केला आहे. भारताने 19.4 ओव्हरमध्ये 230-6 धावा करत हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने 28 चेंडूंमध्ये 42 धावा ठोकल्या.
नमन धीर यानेही केवळ 15 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 33 मध्ये 67 धावा ठोकल्या. पण सामन्यामध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉइंट झाला असता जर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कर्णधार अय्यरचा कॅच सोडला नसता. श्रेयसला जीवदान मिळालं अन् मग पुढे टीम इंडियाने मोठा विजय साकारला.
Dropping catches at crucial moments is typical of New Zealand.🥶
#INDvsNZ https://t.co/ihhGZncAnt
— Nafees (@Nafees_22) October 22, 2026
टीम इंडिया तेव्हा 170-5 धावांवर होती. 14व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर फर्ग्यूसनने श्रेयसला टाकलेल्या चेंडूवर श्रेयसने मोठा फटका मारला आणि मग कॅच केला. पण सुदैवाने हा कॅच फीन अॅलेनने सोडला. हा कॅच जर त्याने पकडला असता तर कदाचित सामन्यात आणखी रोमांच वाढला असता. यानंतर जीवदान मिळालेला सरपंच श्रेयस काही थांबला नाही. त्याने पुढे टीमसाठी महत्त्वपूर्ण धावांचं योगदान दिलं. श्रेयसने मग त्याच्या खेळात २ चौकार आणि एका सिक्सच्या मदतीने 28 चेंडूंमध्ये 42 धावांच योगदान दिलं.
