AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा ‘चक्रम’ करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO

कासिमने त्याच्या खेळीत लगावेल्या एका षटकाराची बरीच चर्चा आहे. त्याने विचित्र पद्धतीने हा षटकार मारला.

Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा 'चक्रम' करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO
| Updated on: Feb 04, 2022 | 2:43 PM
Share

अँटिग्वा: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (icc under 19 cricket world cup) पाचव्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या प्लेऑफच्या सामन्यात पाकिस्तानच्या कासिम अक्रमने (qasim akram) काल एक खास विक्रम आपल्या नावावर केला. कासिमने पाकिस्तानसाठी शतक झळकवताना पाच विकेट घेतल्या. यूथ वनडे इंटरनॅशनलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. कासिमने श्रीलंकेविरुद्धच्या (Pakistan vs Srilanka) सामन्यात 80 चेंडूत 135 धावा तडकावल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्येही त्याने श्रीलंकेला तडाखा दिला. 10 षटकात 37 धावा देत त्याने पाच विकेट घेतल्या. एक उत्तर ऑलराऊंडरचा खेळ त्याने दाखवला. वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. हा फक्त क्रमांक निश्चित करण्यासाठी खेळवण्यात आलेला सामना होता. भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये उद्या अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे.

कासिमची फटेकबाजी प्लेऑफच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 50 षटकात तीन विकेट गमावून 365 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 127 धावात आटोपला. पाकिस्तानकडून कॅप्टन कासिम अक्रम आणि हसीबुल्लाह खान यांनी शतकी खेळी केली. कासिमने 80 चेंडूत 135 धावा आणि हसीबुल्लाह खानने 151 चेंडूत 136 धावा केल्या.

कासिमने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सहा षटकार लगावले. हसीबुल्लाह खानने नऊ चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरा सलामीवीर मोहम्मद शहजादने (73) अर्धशतकी खेळी केली. हसीबुल्लाह सोबत मिळून त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पाकिस्तानने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची आणि दुसऱ्या विकेटसाठी कासिम-हसीबुल्लाहने 229 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेसमोर त्यांनी विजयासाठी 366 धावांचं विशाल लक्ष्य दिलं.

कासिमची जबरदस्त गोलंदाजी कासिमच्या प्रभावी ऑफस्पिन गोलंदाजीसमोर श्रीलंकेने शरणागती पत्करली. 50 धावात श्रीलंकेने सहा विकेट गमावल्या होत्या. यात पाच विकेट एकट्या कासिम अक्रमच्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या विजयात कासिमने महत्त्वची भूमिका बजावली. श्रीलंकेकडून विनुज रनपालने अर्धशतक झळकावलं.

कासिमने त्याच्या खेळीत लगावेल्या एका षटकाराची बरीच चर्चा आहे. त्याने विचित्र पद्धतीने हा षटकार मारला.

संबंधित बातम्या: Shaik Rasheed: कीटकनाशक विकणाऱ्याचा मुलगा आज अंडर 19 टीमचा स्टार, दत्तक घेऊन घडवलेल्या मुलाची गोष्ट IND vs WI: आणखी एका स्फोटक फलंदाजाचा टीम इंडियात समावेश, एका षटकात भारताच्या बाजूने झुकवू शकतो सामना IPL Auction आधीच बेबी एबीचा धमाका, डिविलियर्स सारखा खेळतो, सहा सामन्यात कुटल्या 506 धावा, मोडला भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली