6,6,6,6,6,6, युवराज सिंहचा तडाखा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 सिक्ससह स्फोटक अर्धशतक, पाहा व्हीडिओ

IML 2025 Yuvraj Singh Fifty : इंडियन मास्टर्सचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंह याने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली आहे.

6,6,6,6,6,6, युवराज सिंहचा तडाखा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 सिक्ससह स्फोटक अर्धशतक, पाहा व्हीडिओ
Yuvraj Singh Fifty IML 2025
Image Credit source: @imlt20official x account
| Updated on: Mar 13, 2025 | 10:03 PM

टीम इंडियाचा माजी सिक्सर किंग युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्ती घेऊन अनेक वर्ष झाली आहेत. मात्र युवराजच्या बॅटची धार अजूनही तशीच कायम आहे. युवराजने याची पुन्हा एकदा झळक दाखवून दिली आहे. युवराजने इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 या स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्ध पहिल्या डावात स्फोटक खेळी केली. युवराजने या महत्त्वाच्या सामन्यात झंझावाती अर्धशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे युवराजने सिक्स ठोकून अर्धशतक झळकावलं. युवराजच्या अर्धशतकी खेळीत 6 सिक्सचा समावेश होता.

युवराजने 12 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकला. युवराजने अशाप्रकारे फक्त 26 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. युवराजच्या 52 धावांच्या अर्धशतकी खेळीत 6 सिक्स आणि 1 फोरचा समावेश होता. युवराजने 200 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. युवराजला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र युवराज त्यानंतर 7 धावा जोडून आऊट झाला.

युवराजला डॅनियल ख्रिश्चन याने 15 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शॉन मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं. युवराजने 30 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 1 फोरसह 59 रन्स केल्या. युवराज यासह या सामन्यात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

तसेच युवराज व्यतिरिक्त कर्णधार सचिन तेंडुलकर याने 42, स्टूअर्ट बिन्नी 36, युसूफ पठाण 23, इरफान पठाण नाबाद 19 आणि पवन नेगी याने 14 धावांचं योगदान दिलं. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 221 धावांचं आव्हान मिळालं आहे.

युवराजचा खणखणीत षटकार

मुंबई मास्टर्स प्लेइंग इलेव्हन: सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (विकेटकीपर), गुरकीरत सिंग मान, युसूफ पठाण, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, पवन नेगी, शाहबाज नदीम, धवल कुलकर्णी आणि विनय कुमार.

ऑस्ट्रेलिया मास्टर्स प्लेइंग इलेव्हन : शेन वॉटसन (कर्णधार), शॉन मार्श, डॅनियल ख्रिश्चन, बेन डंक (विकेटकीपर), नॅथन रीअर्डन, बेन कटिंग, स्टीव्ह ओकीफे, नॅथन कुल्टर-नाईल, झेवियर डोहर्टी, ब्राइस मॅकगेन आणि बेन हिल्फेनहॉस.