AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: राजस्थान रॉयल्समध्ये धाकड खेळाडूंची एन्ट्री, ‘हे’ फलंदाज चौक्यांपेक्षा अधिक छक्के ठोकतात

राजस्थान संघाकडून दुसऱ्या पर्वात जोस बटलर, बेन स्टोक्स हे महत्त्वाचे खेळाडू संघात नसतील. त्यामुळे संघाची ताकद कमी होईल असे वाटत असतानाच काही नवीन खेळाडू संघात सामिल झाले आहेत.

IPL 2021: राजस्थान रॉयल्समध्ये धाकड खेळाडूंची एन्ट्री, 'हे' फलंदाज चौक्यांपेक्षा अधिक छक्के ठोकतात
राजस्थान रॉयल्स संघ
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई : आज (21 सप्टेंबर) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हे दोन्ही संघ मैदानात आमने-सामने असतील. पहिल्या पर्वात दोघांमधील सामना अत्यंत उत्कंठावर्धक झाला होता. पंजाबने 4 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या त्रासदायक पराभवाचा बदला घेण्यासाठी आज राजस्थानचा संघ सज्ज झाला आहे. यासाठी त्यांनी संघात काही नवे बदलही केले आहेत. या बदलानंतर संघात आलेले तीन फलंदाजांनी तर या वर्षात तब्बल 236 षटकार ठोकले आहेत. टी20 क्रिकेटमधील या धुरंदरांची नाव आहेत ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips), लियम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आणि एविन लुईस (Evin Lewis). हे तिघेही अनुक्रमे न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघाकडून खेळतात. यंदाच्या आयपीएलमध्ये तिघेही राजस्थानकडून खेळणार आहेत.

राजस्थान संघाकडून दुसऱ्या पर्वात जोस बटलर (Jos Butler), बेन स्टोक्स (Ben Stokes) हे महत्त्वाचे खेळाडू संघात नसतील. त्यामुळे संघाची ताकद कमी होईल असे वाटत असतानाच काही नवीन खेळाडू संघात सामिल झाले आहेत. यामघ्ये वरील फलंदाजासह टी20 क्रिकेटमधील अव्वल क्रमाकांचा बोलर म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी याचही नाव आहे. ग्लेन फिलिप्स आणि एविन लुईस पहिल्यांदाच राजस्थान संघाकडून खेळणार आहेत. तर लिविंगस्टोन पहिल्या पर्वात कोरोनाच्या संकटामुळे सामना खेळू शकला नव्हता. या तिघांनी वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये धमाल उडवली आहे. ग्लेन फिलिप्सने यंदा 87,  लियम लिविंगस्टोनने 81 आणि एविन लुईसने 68 षटकार ठोकले आहेत.

जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi). आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे. टायने उर्वरीत आयपीएलमधून कोरोनाच्या कारणामुळे माघार घेतली आहे. राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने त्याच्या जागी ग्लेन फिलीप्सला संधी देण्यात आली आहे.

आजच्या सामन्यासाठी संभाव्य 11

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, तबरेज शम्सी, चेतन सकारीया.

(In second phase of IPL 2021 rajasthan royals took six hitters evin lewis glenn phillips and liam livingstone)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.