AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021, Points Table: नामिबीयाचा स्कॉटलंडवर 4 विकेट्सनी विजय, भारतीय संघाला टाकलं मागे

पहिल्यांदाच सुपर 12 मध्ये स्थान मिळवलेल्या नामिबीया संघाने त्यांचा पहिला सामना जिंकत ग्रुप 2 मध्येही तिसरं स्थान मिळवलं आहे. त्यांनी भारताला मागं टाकलं आहे.

T20 World Cup 2021, Points Table: नामिबीयाचा स्कॉटलंडवर 4 विकेट्सनी विजय, भारतीय संघाला टाकलं मागे
नामिबीया संघाचा विजय
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 12:03 AM
Share

T20 Cricket World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) सामने अतिशय चुरशीचे सुरु असून काही धक्कादायक निर्णय़ही समोर येत आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात 5 वेळा भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानने भारताला नमवलं. तर सर्वाधिक वेळा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव चाखावा लागला आहे. त्यानंतर आता प्रथमच सुपर 12 मध्ये पोहोचलेल्या नामिबाया संघाने स्कॉटलंडवर (Namibia vs Scotland) 4 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेत त्यांनी भारत, न्यूझीलंड या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.

अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नामिबीयाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. उत्तम गोलंदाजी करत नामिबीयाने आपला निर्णय़ बरोबर ठरवत स्कॉटलंडला अवघ्या 109 धावांवर रोखलं. स्कॉटलंजच्या लीस्क (44) आणि ख्रिस ग्रेव्हस (25) या दोघांच्या भागिदारीमुळे स्कॉटलंडने 100 चा आकडा पार केला.  त्यानंतर अवघ्या 110 धावां करण्यासाठी मैदानात आलेल्या नामिबीया संघाने सुमार फलंदाजी केली. पण बराच काळ क्रिजवर टिकून राहिलेल्या क्रेग विल्यम्सच्या 23 आणि जेजे स्मीतच्या नाबाद 32 धावांनी नामिबियाला 5 चेंडू आणि 4 गडी राखून विजय मिळवून दिला.

गुणतालिकेत भारताला टाकलं मागे

सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत. यामध्ये पाकने भारत आणि न्यूझीलंड या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मात दिल्यामुळे ते 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबीया संघाने स्कॉटलंडला मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड, भारत हे संघ एक-एक पराभव स्वीकारुन चौथ्या, पाचव्या स्थानावर आहेत. तर स्कॉटलंडचा संघ दोन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.

सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित

T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

(In T20 World Cup 2021 Namibia beat scotland with 4 wickets in hand)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...